मोदींच्या नगरमधील सभेदरम्यान काळ्या बनियनवरही बंदी

narendra-modi1
अहमदनगर : आज अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे भाजपचे उमेदवार असून मोदींची सभा त्यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली होती. पण काळ्या कपड्यांवर या सभेआधी बंदी घालण्यात आली. काळ्या कपड्यांवर बंदी सुरक्षेच्या कारणास्तव घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सभेला जो कोणी काळे कपडे घालून येत होता, सभास्थळी त्याला प्रवेश दिला जात नव्हता. त्याचबरोबर खिशात काळ्या रंगाचा रुमाल तर नाही ना हे सुद्धा तपासले जात होते. त्यापेक्षा हद्द म्हणजे काळ्या रंगाची बनियनवरही बंदी घालण्यात आली. काळ्या कपड्यांवर बंदी का असा सवाल तर आहेच, पण काळी बनियनही काढायला लावणे हे म्हणजे सुरक्षेच्या नावावर अघोरी प्रकार म्हणावा लागेल.

Leave a Comment