ए. आर. रेहमान यांच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा

ar-rahman
आजवर नवनवे इतिहास संगीतक्षेत्रातील आघाडीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या गाण्यांनी घडविले आहेत. त्यांच्याकडे संगीतक्षेत्रातील एक उत्तुंग नाव म्हणून पाहिले जाते. त्यांच्या गाण्यांची भूरळ तरुणाईसह सर्वच वर्गातील श्रोत्यांवर पडते. त्यांनी आजवर बॉलिवूडसह इतरही सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. निर्मितीक्षेत्रात आता त्यांनी पाऊल ठेवले आहे. त्यांनी जीओ स्टुडिओसोबत हात मिळवणी केली असून त्यांचा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ’99 साँग्स’ असे असून हा चित्रपट एक प्रेमकथा असणार आहे. ए. आर. रेहमान यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याबद्दल सोशल मीडियावर ए. आर. रेहमान यांनी पोस्ट केली आहे. मी माझ्या पहिल्या चित्रपटाबद्दल फार उत्सुक आहे. एक निर्माता आणि लेखक म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला दिलेल्या प्रेमासाठी आणि प्रोत्साहनासाठी मी सर्वांचे आभार मानतो, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांच्या संगीताप्रमाणे आता त्यांच्या चित्रपटाला चाहत्यांचा कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment