‘अंधाधून’चीनमध्ये दोन आठवड्यांत कमावले १०० कोटी

andhadhun
मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या अभिनेता आयुषमान खुरानाच्या ‘अंधाधून’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत चाहत्यांची मने जिंकली होती. त्यानंतर हा चित्रपट गेल्याच आठवड्यात चीनमध्ये ‘पिआनो प्लेअर’ या नावाने रिलीज झाला होता. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने चीनच्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. विशेष म्हणजे आपल्या बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या तुलनेत हा आकडा दुप्पट होता. ‘अंधाधून’ची प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही घोडदौड सुरुच आहे.

‘अंधाधून’ने पहिल्या पाच दिवसात चीनमध्ये ९५. ३८ कोटींची कमाई केली होती. या संदर्भातील माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरव्दारे दिली आहे. चीनमध्ये ‘अंधाधून’ने आता पर्यंत तब्बल १३६.६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात ऑक्टोबर २०१८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची दोन आठवड्याची एकूण कमाई ही ४१.९० कोटी एवढी होती. पण हिच कमाई चीनमध्ये तिप्पट झाल्याची पहायला मिळली.

मर्डर मिस्ट्रीवर आधारित ‘अंधाधून’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात आयुषमान खुरानासह राधिका आपटे, तब्बू सारखी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांची खूप चांगली पसंती लाभल्यानंतर हा चित्रपट वर्षभराने चीनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय व्हायाकॉम १८ स्टुडिओने घेतला. चीनमध्ये प्रदर्शित झालेला हा व्हायाकॉम १८ स्टुडिओचा आणि आयुषमानचाही पहिलाच चित्रपट आहे.

Leave a Comment