पालघर – सध्या सोशल मीडियात एका आगळ्यावेगळ्या लग्न पत्रिकेची जोरदार चर्चा होत आहे आणि त्या पत्रिकेची चर्चा होण्यामागे कारण देखील तसेच आहे. 22 तारखेला दुपारी 3 वाजता पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वसा सुतारपाडा येथे राहणाऱ्या संजय धाडगा हा एकाच मंडपात दोन वधुंशी विवाहबद्ध होणार आहे.आपल्या दोन जीवनसंगिणीसोबत पेशाने रिक्षाचालक असलेल्या संजय विवाह बंधनात अडकणार आहे. एकाच मंडपात 22 तारखेचा लग्नसोहळा पार पडणार असून त्यासाठी घरासमोरील आवारात तयारी सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर संजय धाडगा आणि बेबी व रीना या दोन वधूची नावे असलेली लग्नासाठी छापलेली लग्नपत्रिका व्हायरल झाली. एकाच मंडपात दोन वधुशी होणाऱ्या अशा अनोख्या लग्नाची चर्चा त्यानंतर सर्वत्र होऊ लागली. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या संजयने सुरू केला. त्याचे 10 वर्षांपूर्वी बेबी नावाच्या मुलीशी सूत जुळल्यानंतर हे दोघे एकत्र घरात राहून संसाराचा गाडा हाकू लागले. त्यातच 8 वर्षांपूर्वी रिना नावाच्या मुलींवर रिक्षाचालक म्हणून कार्यरत असतानाच प्रेम जुळेल. संजयबरोबर बेबी आणि रीना ह्या दोघी एकाच घरात राजीखुशी लग्न न करताच संसारात रममाण झाल्या. बेबीला सध्या एक मुलगा एक मुलगी तर रिनाला एक मुलगी आहे. तिन्ही मुले सध्या शिकत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अनोख्या लग्नाची गजब पत्रिका
अशी अनेक कुटुंब आदिवासी समाजात ऐपत नसल्याने उतारवयात ही सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करतात किंवा मुलेबाळे झाल्यावर ही लग्न लावत असतात. मांसाहारसह मद्यपानावर लग्नात खर्च करावा लागतो. आदिवासी समाजात लग्न खर्च परवडणारा नसतो.