थायलंडमधील सरकारने एक नवीन कायदा तयार केला असून त्यांनी तयार कायद्यानुसार तेथील माय खाओ या बीच जर कोणी सेल्फी काढताना आढळून आल्यास तर त्या व्यक्तिला मृत्युदंडाची शिक्षा केली जाऊ शकते. कारण हा बीच हा बीच फुकेट आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्यामुळे येथून विमाने फार जवळून उडतात. अशात बीचवर फिरणारे पर्यटक फोटो काढतात किंवा सेल्फी घेतात. यात ते वेगवेगळ्या अॅंगलने फोटो काढतात.
पण लोकांच्या या अशा वागण्यामुळे आणि चमकणाऱ्या फ्लॅशमुळे पायलटला अडचण होते. अनेकदा काही अपघात होता होता राहिले असल्यामुळे आता या बीचवर सेल्फी किंवा फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, ड्रोन किंवा लेजर पेनने ज्याप्रकारे पायलटचे लक्ष दुसरीकडे भरकटले जाऊ शकते. त्याचप्रमाणे पायलटचे लक्ष सेल्फी घेणाऱ्यांना पाहूनही भरकटू शकते आणि त्यामुळे मोठा अपघातही होऊ शकतो.
यासाठी केवळ बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाच नाही तर स्थानिक लोकांनाही सूचना देण्यात आली आहे. विमान या परिसरात आल्यावर ड्रोन कॅमेरा किंवा फ्लॅशचा वापर करु नये असा आदेश देण्यात आला आहे. या कायद्यानुसार, या नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर मृत्यूदंडाची शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते. तेथील सरकारला यावर लोकांनी काही सूचनाही दिल्या आहेत. लोकांनी सांगितले की, जर असे काही करायचे असेल तर बीचचा तो भाग बंद करा. पण मुद्दा हा आहे की, याने पर्यटनातून होणाऱ्या कमाईवर परिणाम होईल.