असा असेल आदिनाथचा 83मधील लूक

aadinath-kothare
१९८३ च्या विश्वचषकात बलाढ्य वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने हरवून इतिहास रचला होता. कबीर खान याच विषयावर आधारित ’83’ हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. दिलीप वेंगसरकरची व्यक्तीरेखा यात मराठमोळा आदिनाथ कोठारे साकारत आहे. त्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.


सध्या धर्मशाला येथील क्रिकेट मैदानावर चित्रपटाची संपूर्ण टीम दिग्गजांकडून क्रिकेटचे धडे गिरवत आहे. या ठिकाणी स्वतः कपिल देव यांनी भेट देऊन सर्वच कलाकारांचे मनोबल वाढवले होते. आदिनाथनेही कपिल देव यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

हुबेहुब दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा आदिनाथचा लूक दिसत आहे. सध्या तो केवळ क्रिकेट खेळण्यावर भर देण्यासोबतच वेंगसरकर यांची देहबोली, बोलणे आणि दिसणे यावर भर देताना दिसत आहे. आदिनाथ धर्मशालाच्या मैदानात रणवीर सिंगसह सहकारी कलाकारांसोबत एन्जॉय करीत आहे.

Leave a Comment