‘कबीर सिंह’साठी रोज २० सिगरेट फुकायचा शाहिद कपूर

shahid-kapoor
अभिनेता शाहिद कपूर तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक कबीर सिंहसाठी दररोज 20 सिगरेट आणि बीडी ओढायचा. त्याचबरोबर ते केल्यानंतर शरीराला येणारा सिगरेटचा वास जाण्यासाठी घरी जाण्यापूर्वी आणि मुलांना भेटण्यापूर्वी तो किमान दोन तास आंघोळ करायचा.

शाहिद उडता पंजाब चित्रपटानंतर पुन्हा एकदा नशा करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. त्याला याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, कोणत्याही प्रकारे स्मोकिंगची जाहिरात मी करत नाही. पण मला हे व्यक्तिरेखेसाठी करावे लागले. मी शूटिंग दरम्यान दररोज २० सिगरेट ओढायचो. त्यामुळेच मुलांजवळ जाण्याआधी मी दोन तास आंघोळ करायचो. सिगरेटचा वास त्यांना येणार नाही याची काळजी मी घ्यायचो.

शाहिद कपूरने अँग्री यंग मॅनवाल्या लुकसोबत कॉलज बॉय आणि नंतर डॉक्टरची भूमिकाही केली आहे. शाहिदने या वेगवेगळ्या भूमिकांसाठी सुरुवातीला आठ किलो वजन वाढवले आणि त्यानंतर कॉलेजमधला मुलगा वाटावा म्हणून जवळपास १२ किलो वजन कमी केले.


दरम्यान, या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. या टीझरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. शाहिद कपूरच्या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे शेड्स टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. एकीकडे त्याचे कॉलेजच्या वर्गात शिक्षक भरभरून कौतुक करत असतात. तर तो दुसरीकडे घराच्या छतावर दारू पिताना दिसतो. संदीप वांगा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट या वर्षी २१ जूनला रिलीज होणार आहे.

Leave a Comment