रणवीर सिंहकडून पोलार्डला ‘राक्षस’ पदवी बहाल

ranveer-singh1
काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा मुंबई इंडियन्सने 3 गडी राखून पराभव केला. कर्णधार पोलार्डने अल्जारी सोजेफसह 3.4 षटकांत 54 धावांची भागिदारी करत मुंबई इंडियन्स संघाच्या विजयाचा पाया रचला. मुंबई इंडियन्सने पोलार्डच्या दमदार खेळीच्या जोरावर पंजाबचा तीन विकेटने पराभव केला.


पोलार्डने मुंबईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. सगळीकडून पोलार्डच्या या कामगिरीचे खूप कौतूक होत आहे. त्याचबरोबर बॉलिवूडचा बाजीराव अर्थाल रणवीर सिंह याने देखील सोशल मीडियावर त्याचे कौतूक केले आहे. रणवीरने त्याचा उल्लेख राक्षस असा केला आहे. रणवीर पोलार्डची खेळी पाहून खूपच प्रभावित झाला आहे. पोलार्ड एक राक्षस असून जबरदस्त फलंदाजी!!!, भन्नाट आत्मविश्वास!!!, सर्वश्रेष्ठमध्ये सर्वोत्तम!!!, चांगला कर्णधार!!!, प्रेरणादायी नेतृत्व!!!. प्रतिभाशाली!!!, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment