एकापाठोपाठ एक धमाकेदार चित्रपट घेऊन येणाऱ्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या नावाची फारच चर्चा रंगत आहेत. ‘सिम्बा’, ‘गली बॉय’ अशा एकापेक्षाएक चित्रपटानंतर रणवीरचा ’83’ चित्रपट चाहत्याचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी रिलीज केला आहे. चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवरून रिलीज केलेल्या या पोस्टमध्ये पडदा उठवण्यात आला आहे.
रिलीज करण्यात आला रणवीरच्या ’83’ चित्रपटाचा फर्स्ट लूक
चित्रपटातील कलाकारांना धर्मशाला येथे प्रशिक्षण देण्याचे काम चालू आहे. रणवीर आणि माजी क्रिकेटर कपिल देव यांचे फोटो मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. चित्रपटाची शुटिंग सुरू होण्या आधीच निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
Release date finalized: 10 April 2020… Ranveer Singh is #KapilDev in #83TheFilm… Directed by Kabir Khan… Presented by Reliance Entertainment… Produced by Madhu Mantena, Vishnu Induri, Kabir Khan. #Relive83 pic.twitter.com/GPePs8fLmK
— taran adarsh (@taran_adarsh) April 10, 2019
पुढील वर्षी 10 एप्रिल 2020ला चित्रपट ’83’ रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 मे पासुन चित्रपटाचे शुटिंग सुरू होणार आहे. लंडन आणि स्कॉटलँड येथे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. हा चित्रपट केवळ 100 दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.
महान क्रिकेटर कपिल देव यांची यशोगाथा रेखाटण्याचा प्रयत्न ’83’ चित्रपटामध्ये केला आहे. रणवीर सिंह हा चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणवीरसह पंकज त्रिपाठी, साकिब सलीम, चिराग पाटिल, ताहिर भासिन, साहिल खट्टर, आर बद्री, हार्डी संधु, एमी विर्क हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.