रजनीकांत यांच्या दरबारचा फर्स्ट लुक रिलीज

rajanikanth
सुपरस्टार रजनीकांत हे आगामी दरबार या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर धमाका करण्यासाठी येत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. दाक्षिणात्य यशस्वी दिग्दर्शक ए. आर. मुर्गाडोस हे दरबार या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.रजनीकांत यांचा अनोखा लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

पोस्टरकडे नजर टाकल्यास यात थलैवा रजनीकांत अनोखा काळा गॉगल घालून हसताना दिसत आहेत. आधुनिक शस्त्रास्त्रे त्याच्या खांद्यावर दिसत असून पोलिसी कुत्रा आणि कॅपही दिसत असल्यामुळे दरबार चित्रपटात तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे का याबद्दलची उत्सुकता ताणली आहे. २०२० च्या पोंगलला म्हणजेच मकर संक्रातीला रजनीकांतचा हा दरबार चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment