संगीत क्षेत्रात पाऊल टाकणार ‘धकधक गर्ल’

madhuri-dixit
बॉलीवूडमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितला ‘धकधक गर्ल’ म्हणून देखील ओळखले जाते. माधुरीच्या ‘कलंक’ चित्रपटातील ‘तबाह हो गए’ हे गाणे काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते. सोशल मीडियावर हे गाणे तुफान व्हायरल झाले. अनेकांना या गाण्यातील माधुरीच्या दिलखेचक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने भूरळ घातली आहे. अभिनय आणि नृत्यानंतर माधुरी आता संगीतक्षेत्रात प्रवेश करणार आहे.

या संदर्भातील वृत्त मिड डेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्यांदाच व्यावसायिक पातळीवर माधुरी गायन करणार आहे. त्याचबरोबर तिच्या पहिल्या अल्बमचे रेकॉर्डींग पूर्ण झाले असून हा अल्बम या वर्षींच रिलीज करण्यात येणार असल्याचे माधुरीने सांगितले आहे. माधुरी सध्याच्या घडीला ‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्यामुळे अल्बमच्या व्हिडिओचे चित्रीकरण लांबणीवर टाकण्यात आले आहे. माधुरीने याआधी गुलाब गॅंग चित्रपटासाठी रंगी सारी हे गाणे गायले होते. त्यानंतर माधुरी आता पहिल्यांदाच पॉप सिंगिंग करणार आहे. माधुरीचा हा एक इंग्लिश अल्बम असून सहा पॉप गाण्यांचा ज्यामध्ये समावेश आहे.

Leave a Comment