स्टाईलिश बॅगवर करण जोहर करतो लाखो रुपये खर्च

karan-johar
बॉलीवूडचा डॅडी म्हणून ओळख असलेला निर्मात दिग्दर्शख करण जोहर हा केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या स्टाईलमुळे देखील चर्चेत असतो. करण नुकताच एका विमानतळावर एका महागड्या स्टाईलिश बॅगसोबत स्पॉट झाला. त्या बॅगमध्ये लोकांना नवल वाटले असे काही नव्हते. पण ज्यावेळी त्यांना त्याच्या बॅगची किंमत कळाली त्यावेळी त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. आता तुम्ही म्हणाल की किती असेल या बॅगची किंमत… असून असून 50 हजार ते 2 लाखाच्या घरात असेल. पण असा जर विचार तुम्ही करत असाल, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. कारण त्याच्या बॅगच्या किंमतीत तुम्ही एखादी कार विकत घेऊ शकता.
karan-johar1
१० हजार ४९५ डॉलर एवढी करण जोहरच्या या बॅगेची किंमत आहे. म्हणजेच भारतीय बाजारमूल्यानुसार या बॅगेची किंमत ७ लाख २८ हजार ६९५ रुपये आहे. The rainbow Louis Vuitton ब्रँडची ही बॅग आहे. करण हे पहिल्यांदा नाही जेव्हा महागड्या गोष्टींमुळे चर्चेत आला. सर्वात महागड्या ब्रँडचे कपडे आणि बॅगमुळे तो याआधीही अनेकदा चर्चेत आला आहे.
karan-johar2
करण जोहरची महागड्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करण्यात टक्कर पंजाबचा प्रसिद्ध पॉप स्टार दिलजीत दोसांज आणि बादशहा यांच्यासोबत आहे. करणने बादशहा आणि दिलजीतपैकी कोण पटकन ब्रँड ओळखले याची परीक्षा कॉफी विथ करणमध्ये घेतली होती.

Leave a Comment