लंडन पोलिसांनी केली ज्युलियन असांजला अटक

Julian-Assange
लंडन – इक्वेडोरच्या दुतावासातून विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक करण्यात आली असून असांज याच दुतावासात आपली अटक टळावी या उद्देशाने वास्तव्य करत होता. त्याला आसरा देण्यास इक्वेडोरने नकार दिल्यानंतर त्याला लंडन पोलिसांनी अटक केली. असांजने विविध देशांची, राजकारण्याची माहिती, कागदपत्रे, संभाषण जाहीर केल्यामुळे अनेक मंडळी त्याला अटक व्हावी यासाठी प्रयत्नात होती. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

असांजला आता वेस्टमिनिस्टर कोर्टापुढे हजर करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. २०१० मध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे असांजने सार्वजनिक केली होती. तो २०१२ पासून आपली अटक टळावी म्हणून इक्वाडोर येथील दुतावासात वास्तव्य करत होता. त्याला १२ डिसेंबर २०१८रोजी इक्वाडोरचे नागरिकत्व मिळाले होते. असांजला दिलेला आश्रय इक्वाडोर सरकारने काढून घेतल्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुप्त कागदपत्रे आणि गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment