सिरिअल किसरसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार महानायक

amitabh-bacchan
बॉलीवूडमधील प्रत्येक कलाकारचे बी-टाऊनचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न असते. त्याचबरोबर अमिताभ यांच्यासोबत सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी काम केले आहे. पण आता बॉलीवूडचा सिरिअल किसर अर्थात इम्रान हाश्मी पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

या संदर्भात एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट कोर्ट ड्रामा असू शकतो. अमिताभ हे आतापर्यंत ‘बदला’, ‘पिंक’सारख्या’ चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसले होते. आता ते पुन्हा एकदा या चित्रपटात त्याच भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रुमी जाफ्री असून बच्चन यांनी रुमी यांच्यासोबत यापूर्वी ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ चित्रपटात काम केले होते.

अमिताभ बच्चन यांचा ‘बदला’ चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून यश लाभले. तर बच्चन यांनी काहीदिवसांपूर्वी नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटाचेही चित्रीकरण संपवले. बच्चन आता नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सज्ज झाले आहे. नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मे महिन्यात सुरूवात होणार आहे. चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरली नाही.

Leave a Comment