शाओमीची ऑटोक्षेत्रात भागीदारी

bestun
चीनच्या स्मार्टफोन आणि गृहोपयोगी उपकरणे निर्मात्या शाओमीने व्यवसाय क्षेत्राचा विकास करताना आता कार उत्पादन हिस्सेदारी घेतली असून चीनच्या एफएडब्ल्यू ग्रुप सह स्पेशल एडिशन मॉडेल बेस्टयुन टी ७७ क्रॉसओव्हर कारसाठी मोठे फिचर पुरविले आहे. या कारसाठी शाओमी एआय व्हर्च्युअल असिस्टंट फिचर देत असून शाओ एआय सध्या ज्या प्रमाणे एआयचा वापर कार हायटेक करण्यासाठी केला जातो त्याचप्रकारे वापरले जाऊ शकणार आहे. यात लाईट, एसी ऑन ऑफ करणे यासह अन्य ऑपरेशनही करता येणार आहेत.

shaaomi
सध्या एआय असिस्टंट क्षेत्रात अमेरिकेच्या अॅपलचे सिरी, अलेक्सा, सॅमसंगचे बिक्सबाय यांचे प्रभुत्व आहे. या सर्व उपकरणांना शाओमी टक्कर देणार आहे. चीन मध्ये गुगल काम करत नाही त्यामुळे चीनच्या बाजारात वर्चस्व मिळविणे शाओमीला सोपे जाईल पण चीन बाहेरच्या बाजारातही आम्ही अॅपल व अन्य कंपन्यांना जोरदार टक्कर देऊ असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीचे अधिकारी सांगतात आमचे फिचर अन्य वाहनात मिळणाऱ्या व्हर्चुअल असिस्टंट फिचर व कंट्रोल स्मार्टहाउस फंक्शनपेक्षा खूपच सक्षम आहेत. बेस्टून टी ७७ ही ४.५ मीटर लांबीची ५ सीटर कार असून तिला १.२ लिटरचे टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. ही कार ७ स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सह असून ती फक्त चीनमध्येच विकली जाते.

Leave a Comment