युट्युबसाठी भारत सर्वात मोठा बाजार, युजर संख्या २६.५ कोटींवर

tube
भारत युट्यूबसाठी सर्वात मोठा आणि सर्वाधिक वेगाने विकसित होणारा बाजार ठरला असून आकडेवारीनुसार दर महिना २६.५ कोटी युजर्स व्हिडीओ शेअरिंग साठी या वेबसाईटचा वापर करत आहेत. कंपनीचे सीइओ सुझान वोजीस्की यांच्या म्हणण्यानुसार भारतात युट्युबचे सर्वाधिक दर्शक असून जगाच्या तुलनेत भारतीय दर्शकांची संख्या खूपच वेगाने वाढती आहे. युट्युब आज कंटेंट कंझ्युम माध्यम बनले असून मनोरंजन असो वा माहिती असो युट्युबला प्राधान्य दिले जात आहे.

users
गेल्या वर्षात मोबाईलवर युट्युबचा वापर ८५ टक्के वाढला असून व्हिडीओ पाहण्यात भारतातील ६ मोठी शहरे ६० टक्के वेळ देत आहेत. आज युट्युब वर १२०० भारतीय त्यांचे चॅनल्स चालवित असुन त्याचे १० लाख युजर्स आहेत. पाच वर्षापूर्वी फक्त २ लोकांचे चॅनल्स युट्युब वर होते. युट्युबच्या ग्रुप आशिया पॅसिफिकचे सीइओ पॅटरसन म्हणाले, ग्राहक व्यवसाय वेगाने मोबाईल व्हिडीओ कडे वळत असून भारत युट्युबच्या विकास बाजारासाठी चांगला संकेत आहे. येथे तुम्ही कथा सांगू शकता, पुढे जाऊ शकता, क्रॉस चॅनल प्लानिंग करू शकता.

बजाज ऑटोचे एग्झीक्यूटिव्ह डायरेक्टर राकेश शर्मा म्हणाले, ऑटो युजर्ससाठी युट्यूब चांगले माध्यम असून युजर्स पर्यंत या माध्यमातून आम्ही अधिक चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो आणि मार्केटिंग करू शकतो.

Leave a Comment