वाराणसीत करा दणकून खरेदी आणि घ्या मस्त पदार्थांचा आस्वादही

market

वाराणसी ही भारताची धर्मनगरी म्हणून प्रसिद्ध आहे आणि केवळ देशभरातून नाही तर विदेशातूनही येथे लाखो पर्यटक वर्षभर हजेरी लावत असतात. वाराणसी, काशी, बनारस अशी विविध नवे असलेले हे शहर मोक्ष नगरी म्हणूनही हिंदू धर्मियांचे श्रद्धेचे स्थान आहे. येथे यायचे तो मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून हे खरे असले तरी वाराणसीचा बाजार आणि येथील खाद्य संस्कृती हा खास अनुभवण्याचा विषय आहे याची अनेकांना माहिती नसेल. तेव्हा वाराणसी भेटीचा कार्यक्रम आखला असेल तर तेथील बाजाराला भेट देण्यास विसरू नका आणि खरेदी करून दमलात कि एकापेक्षा एक स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांवर हात मारायलाही विसरू नका.

books
वाराणसीच्या बाजारात कुणीही एकदा शिरला की तो मोकळ्या हाताने बाहेर येउच शकत नाही अशी त्याची ख्याती आहे. तुम्ही साहित्याचे शौकीन असाल तर या शहरात मोठ्या संखेने असलेल्या बुक डेपो मध्ये जाऊन अनेक प्रसिद्ध लेखकांची पुस्तके घेऊ शकता. दुकानात पुस्तक उपलब्ध नसेल तर दुकानदार ते मागवून तुम्हाला कोणत्याची गावी पाठवितात.

saree
बनारसी साडी जगात प्रसिद्ध आहे. तेव्हा साडी खरेदी तर व्हायलाच हवी. बनारसी साडी ही खास परंपरा असून या शहराचा वारसा आहे. या साड्या देशविदेशात लोकप्रिय असून बॉलीवूड पासून हॉलीवूड पर्यत त्यांची क्रेझ आहे. या साड्या विणल्या जात असताना पाहण्याची सोय येथे आहे. गोल्डन, सिल्व्हर, ब्रोकेड, सिल्क, ऑर्गनझा, जोर्जेट अश्या अनेक प्रकारात त्या मिळतात आणि त्यांच्यावरची नजर हटविणे हे फारच अवघड काम आहे याचा अनुभव घेऊ शकता. सिल्कची साडी अस्सल आहे यासाठी येथे रिंग टेस्ट करून दाखविली जाते. म्हणजे साडी अंगठीतून काढून दाखविली जाते.

vadye
सतार आणि सनई या वाद्यांचे या शहराशी अनोखे नाते आहे. प्रसिद्ध सतारिये पंडित रविशंकर आणि सनईवादक बिस्मिल्लाखान यांचे हे शहर. त्यामुळे येथे सतार, शहनाई, तबला अशी अनेक वाद्ये बनविली जातात आणि त्यांना जगभरातून मागणी आहे. यातील बहुतेक वाद्ये हाताने घडविली जातात. बंगाली तोता आणि अशी अनेक दुकाने येथे ही वाद्ये विक्री करतात.

food
बनारस मध्ये तांबा आणि पितळ या धातूंच्या अनेक वस्तू, भांडी मिळतात. मंदिरातील पूजा उपकरणे मोठ्या प्रमाणावर येथे बनविली जातात. कमंडलू, तांबे, ताम्हणे, समया तसेच अनेक भेट देता येतील अश्या वस्तू येथे मिळतात. रस्त्यांवर मूर्ती, टाय आणि डाय वस्तू, स्कार्फ, घरसजावटीच्या वस्तू ढिगाने मिळतात. खरेदी करून दमलात कि पोटपूजेसाठी अनेक चविष्ट चमचमीत आणि गोड पदार्थ आहेतच. त्यात चाट, सामोसो, रबडी, लस्सी बरोबर बनारसी पान खायचे विसरायचे नाही. बनारसी बाजार फिरायचा म्हणजे अरुंद गल्ल्या बोळ पालथे घालायचे पण त्यात फिरण्याचा आनंद वेगळाच आहे आणि तो अनुभवायला हवा.

Leave a Comment