सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला लालू प्रसाद यादवांचा जामीन अर्ज

lalu-prasad-yadav
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने चारा घोटाळाप्रकरणात दोषी आढळलेल्या लालूप्रसाद यादवांना जामीन देण्यास नकार दिला आहे. चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव दोषी आढळले असून १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना झाली आहे. ते मागील २४ महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने लालू प्रसादांच्या जामिनाची मागणी करणाऱ्या अर्जाला फेटाळताना नमूद केले आहे की, १४ वर्षांच्या शिक्षेच्या तुलनेत तुरुंगात काढलेले २४ महिने नगण्य आहेत. त्यांचे वकिल कपिल सिब्बल यांनी लालू प्रसाद यादव यांच्या जामीनाची मागणी केली. सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला होता की, कुठल्याही प्रकारचा मुद्देमाल हस्तगत झाला नव्हता, मुख्य गुन्हा हा फक्त कट रचल्याचा होता. खंडपीठाने यावर असे स्पष्ट केले की उच्च न्यायालयाचे खटल्याचे मूल्यमापन करण्याचे काम आहे. या क्षणी आमचे काम फक्त जामीन अर्जाचा विचार करणे असेही खंडपीठाने म्हटले आहे.

Leave a Comment