निवडणूक कालावधीत ‘नमो टीव्ही’चे शटडाऊन

namo-tv
नवी दिल्ली – अवघे काही तास लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला उरले असतानाच भारतीय जनता पक्षाला या मतदानाआधीच सकाळपासून जोरदार दणके दिले जात आहेत. भाजपविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली आहे.

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा पीएम नरेंद्र मोदीच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. आता त्यानंतर निवडणूक आयोगाने 24 तास प्रसारण होणाऱ्या नमो टीव्हीवरही कारवाई केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नमो टीव्हीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली असल्यामुळे निवडणुकीच्या काळात हा चॅनेल प्रसारित करता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकवर काढलेला निर्णय हा नमो टीव्ही या चॅनेलसाठी लागू असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment