‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये ‘वुल्वरिन’ची नोंद

Wolverine
एखादा कलाकार त्याने एखाद्या चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेमुळे मोठा होतो किंवा अनेकदा तो नावाजलेला कलाकार त्या व्यक्तिरेखेला मोठा करतो. याबाबत सांगायचे झालेच तर अभिनेता टॉम हॉलंडला ‘स्पायडरमॅन’ या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धी मिळाली. तर ‘आयर्नमॅन’ ही व्यक्तिरेखा रॉबर्ट डाउनी ज्युनिअरमुळे लोकप्रिय झाली. पण ‘वुल्वरिन’ ही व्यक्तिरेखा साकारणारा ह्यू जॅकमनही त्याच ताकदीचा अभिनेता असल्यामुळे दोघेही ते एकमेकांत एकरूप झालेले दिसतात. जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक म्हणून एक्स-मॅन सुपरहिरोपट मालिकेतील ‘वुल्वरिन’ ओळखला जातो. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हा पुरस्कार देऊन एवढी अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या या ‘वुल्वरिन’चा गौरव करण्यात आला आहे.

हा पुरस्कार अद्वितीय किंवा विलक्षण विक्रम करणाऱ्या व्यक्तिंना देण्यात येतो. वुल्वरिने ही व्यक्तिरेखा सलग १८ वर्ष साकारल्यामुळे अभिनेता ह्यू जॅकमनला ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार धिस मॉर्निंग विथ फिलिप्स अँड हॉली या कार्यक्रमात देत त्याला आश्चर्याचा धक्काच दिला गेला. ह्यू जॅकमनबरोबरच एक्स-मॅन चित्रपट मालिकेत प्रोफेसर एक्स व्यक्तिरेखा साकारणाऱ्या पॅट्रिक स्टीवर्ट यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.

Leave a Comment