नवी दिल्ली – इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसी विश्वचषकात स्पोर्ट्स फॅन्सना सन्मानित करण्याचा निर्णय भारतातील सर्वात मोठी फॅन कन्युनिटी ‘इंडियन स्पोर्ट्स फॅन’ने घेतला आहे. ग्लोबल स्पोर्ट्स फॅन्स पुरस्काराने या फॅन्सना सन्मानित करण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकरचा जबरा फॅन सुधीर चौधरी याचाही यात समावेश आहे.
इंग्लंडमध्ये होणार सचिनच्या ‘जबरा फॅन’चा सन्मान
सुधीर चौधरीसोबत यावेळी जगातील इतर ४ फॅन्सना सन्मानित करण्यात येणार आहे. १४ जून रोजी हा पुरस्कार लंडन येथे देण्यात येणार आहे. याचसोबत इमजिर्ंग स्पोर्ट्स फॅन्सचाही गौरव करण्यात येणार आहे. खेळाला जे पॅशन बनवून जगातील कोणत्याही ठिकाणी जाऊन भारतीय संघाचे समर्थन करीत असतात.
सुधीर या कार्यक्रमाबाबत बोलताना म्हणाला, गेल्या १८ वर्षांपासून मी भारतीय संघाचे समर्थन करत फिरतो आहे. त्याने यात ३१९ एकदिवसीय, ६६ कसोटी, ७३ टी-२०, ६८ आयपीएलचे सामने आणि ३ रणजी चषकाचे सामने पहिले आहेत. हा पुरस्कार देण्यात येणार असल्याने मला आनंद होत आहे. हा पुरस्कार मी सचिन तेंडुलकरला समर्पित करतो.