पुर्वश्रमीची पोर्नस्टार आता बनली आहे धर्म प्रसारक

pornstar
कॅलिफोर्निया – अमेरिकेतील एक पूर्वाश्रमीची पोर्नस्टार आता धर्म प्रसारक बनली असून इतर महिलांना ती आता या क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे. फक्त असे ती सांगत नसून कोण कोणत्या अडचणींचा सामना पोर्न स्टारला करावा लागतो तसेच यातील धोकाही ती महिलांना सांगते. आपण या क्षेत्रात आर्थिक तंगी आणि लवकर श्रीमंत बनण्याच्या लालसेपोटी आल्याचे ती सांगते. पण तिला आता पश्चात्ताप झाला आहे. महिलेचे संपूर्ण आयुष्य आजीच्या सल्ल्याने कशाप्रकारे बदलले आणि हे क्षेत्र तिने सोडले हेही महिलेने सांगितले आहे.

अमेरिकेच्या सॅन डियागोच्या कॉर्नरस्टोनमध्ये राहणारी ब्रिटनी डी ला मोरा (31) आणि तिचा पती धर्म प्रसारक असल्यामुळेच ते चर्चमध्ये धार्मिक उपदेशही देतात. ब्रिटनी 6 वर्षांपूर्वी एक यशस्वी पोर्नस्टार होती. जेना प्रेस्ले नावाने तिने 300 हून जास्त पोर्न व्हिडिओजमध्ये काम केले होते. महिन्याला ती जवळपास 30 हजार डॉलर (सुमारे 21 लाख रुपये) कमवत होती. पण तिने धर्मोपदेशक बनण्यासाठी पोर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकला.

एक डायरेक्टरने काही वर्षांपूर्वी ब्रिटनीला वजन कमी करण्यास सांगितले तर तिने खाणे-पिणे एवढे कमी केले की तिला अॅनोरेक्सिया नावाचा आजार झाल्यानंतर ती अंमली पदार्थांच्या आहारी गेली. ब्रिटनीला त्यानंतर एक लैंगिक आजार जडला. त्यानंतर तिला आजीने चर्चमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तिचे संपूर्ण जीवन त्याचवेळी बदलून गेले. चर्चमध्ये गेल्यावर तिच्यावर असाकाही परिणाम झाला आणि अखेर तिने 2012 मध्ये पोर्न इंडस्ट्री सोडली.
pornstar1
ब्रिटनीने नुकत्या एका इंटरव्ह्यू मध्ये इतर महिलांना पोर्न इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. या क्षेत्रातील अनेक अशा अडचणी आहेत ज्या पैशाच्या झगमगाटात दिसत नाहीत. ब्रिटनीने सांगितले की, असे ती यासाठी म्हणत आहे कारण तिने ते काम सुरू केले तेव्हा ती भविष्याबाबत विचार करत नव्हती. पण तुम्ही भविष्याचा विचार करत असाल तर पोर्न इंडस्ट्रीत जाण्याआधी तुम्हाला हे लक्षात असायला हवे की, जे काम तुम्ही करणार आहात ते आयुष्यभर इंटरनेटवर राहील. ब्रिटनीच्या मते एकदा पोर्न इंडस्ट्रीत तुम्ही काम केले तर तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम कायम पडत राहतो. कारण इंटरनेटच्या जगात तुमचे काम कायम राहते. त्याचा भविष्यात तुम्हाला त्रासही होत राहतो.

ब्रिटनीने स्वतःचे उदाहरण देताना सांगितले, तुम्ही धर्म प्रसारक बनल्या आहात मग व्हिडिओ इंटरनेटवरून का हटवत नाही असे लोक मला नेहमी विचारतात. मला तेव्हा त्यांना सांगावे लागते की, पोर्न इंडस्ट्रीतील कॉन्ट्रॅक्ट साइन केल्याने त्यांचे नियम कायदे पाळणे गरजेचेच असते. असे व्हिडिओ त्यांची प्रॉपर्टी असतात, आपण ते हटवू शकत नाही.

स्वतःबाबत सांगताना ब्रिटनी म्हणाली की, आता तिची मुले होतील तेव्हा तिच्या या फुटेजचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल याची तिला भीती आहे. यामुळेच ती इतर महिलांनाही याबाबत अलर्ट करत आहे. या क्षेत्रात येणाऱ्या महिलांना ती म्हणाली, तुमच्या मुलांचे काय होईल, ते शाळेत गेल्यानंतर त्यांची खिल्ली उडवली जावी किंवा त्यांना त्रास दिला जावा असे वाटते का असेही ती म्हणाली. ब्रिटनीचे म्हणणे आहे की, घरातील लोकांना ती फारशी आवडत नव्हती. तसेच शिकण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे पैसे कमावण्यासाठी ती याक्षेत्रात आली.

Leave a Comment