मतदानाचा हक्क बजावा आणि या वस्तुंवर भरघोस सूट मिळवा !

election1
उद्या म्हणजेच 11 एप्रिल रोजी 17व्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात 18 राज्यांमध्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशात 91 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. निवडणूक आयोग यात मतदान जनजागृतीसाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहे. मतदानादिवशी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल 50 पैसे स्वस्त मिळेल, पण यासाठी ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी एक अट ठेवली आहे.

ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी घोषणा केली आहे की, मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई पेट्रोल पंपावर दाखवल्यानंतर खरेदीत 50 पैसे प्रति लीटर सूट मिळेल. मतदान करणाऱ्यांना औषधांच्या खरेदीवर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनुप खन्ना यांनी 10 टक्के सूट दिली जाईल, असे सांगितले आहे.

मतदान करणाऱ्यांमध्ये कोणी आजारी असतील तर त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी आणि उपचार केले जातील. नोएडातील फेलिक्स हॉस्पिटल, प्रकाश हॉस्पिटलमध्ये ही सुविधा मिळेल. सिल्चर लोकसभा मतदार संघात सोन्याचे दागिन्यांच्या निर्मिती खर्चात 15 टक्के सूट देण्यात येत आहे. तर अनेक हॉटेल्समध्ये 10 ते 15 टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. यासाठी मतदान करणे ही एकमेव अट असेल. विशेष म्हणजे ही ऑफर एक दिवसासाठी नसून 18 आणि 19 एप्रिल अशी दोन दिवस असेल. याचा लाभ घेण्यासाठी बोटावर मतदानानंतर लावण्यात आलेली शाई दाखवावी लागेल.

Leave a Comment