विश्वचषकात पहायला मिळणार ऑस्ट्रेलियन संघाचा नवा अवतार

austrila
सिडनी – आयसीसी विश्वचषक-२०१९ च्या स्पर्धेत गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपल्या नव्या जर्सीचे मंगळवारी अनावरण करण्यात आले आहे. आपल्या जर्सीसाठी कांगारू संघाने पारंपरिक पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा वापर केला आहे.


ग्लेन मॅक्सवेलचा नव्याकोऱ्या जर्सीतील फोटो शेअर करत ऑस्ट्रेलिया संघासाठी जर्सी बनवणाऱ्या ASICS या कंपनीने नव्या जर्सीचे अनावरण केले. पाच वेळचा विश्वचषक विजेता आणि गतविजेता असलेला ऑस्ट्रेलियन संघ या नव्या जर्सीत विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दरम्यान मार्च महिन्याच्या अखेरीस चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची बंदी संपुष्टात आल्यामुळे विश्वचषकासाठी ते ऑस्ट्रेलियन संघात परतण्याची दाट शक्यता आहे. संघात ते परतल्यास कांगारूंचा संघ हा अधिक मजबूत होणार आहे. ३० मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असून ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना १ जूनला अफगाणिस्तानशी होणार आहे.

Leave a Comment