रविवारी होत असलेली चायनीज ग्रांप्री ऐतिहासिक ठरणार

racing
चीनच्या शांघाई इंटरनॅशनल सर्किटवर रविवारी होत असलेली चायनीज ग्रांप्री फॉर्म्युला रेस ऐतिहसिक ठरणार आहे कारण फॉर्म्युला वनची ही एक हजारावी रेस आहे. यात १० टीमचे २० ड्रायव्हर सहभागी होत असून लुईस हेमिल्तन आणि सेबेस्टीयन वेटल यांचा त्यात समावेश आहे. एफ वनच्या ६९ वर्षाच्या इतिहासात आत्तापर्यंत ९९९ रेस झाल्या आहेत.

formula
युरोपियन ग्रांप्री मोटाररेसची कन्सेप्ट १९२० मध्ये प्रथम अस्तित्वात आली होती. त्यावेळी स्थानिक पातळीवर या रेस होत. १९४६ मध्ये प्रथम यासाठी फॉर्म्युला शब्द वापरला गेला. त्यात सर्वाधिक क्षमतेच्या कारसाठी एफ १, थोड्या कमी क्षमतेच्या कारसाठी एफ २, एफ ३ अशी वर्गवारी केली गेली. १९५०च्या जून मध्ये ब्रिटन येथे सिल्व्हरस्टोन सर्किटवर पहिली रेस झाली तेव्हा पाणबुडीसारख्या सिंगल सीटर कार वापरल्या गेल्या होत्या. त्यांना १५०० सीसीचे इंजिन होते. या रेस मध्ये अमेरिकेच्या जॉनी पर्सन्स याने विजेतेपद मिळविले होते. विशेष म्हणजे तेव्हाही ही रेस पाहण्यासाठी १ लाख प्रेक्षक उपस्थित होते.

ferrary
आता या रेसमध्ये २३ देशातील १०५ ड्रायव्हर कधी ना कधी विजयी झाले आहेत. मायकेल शुमाकर या अमेरिकन चालकाने सर्वाधिक म्हणजे ९१ वेळा या रेसमध्ये विजय पताका फडकविली आहे. चायनीज ग्राम्पीची सुरवात २००४ मध्ये झाली असुन तेव्हापासून सर्वाधिक ५ वेळा विजयी होण्याचा मन लुइस हेमिल्टन याने मर्सिडीज टीम तर्फे मिळविला आहे. हे सर्किट ५.४ किमीचे असून रेस अंतर ३०५ किमी आहे. त्यात ५६ लॅप्स आहेत.

michael
एफवन रेस मध्ये आता टर्बोचार्ज्ड, १२ पिस्टन ६ सिलिंडर इंजिन कार वापरल्या जातात तसेच व्ही ६ इंजिन आले असून ते अतिशय कॉम्पॅक्ट आहे. तसेच या कार्सना मल्टीप्लेट क्लच आहेत. आत्तापर्यंत एफ वन मध्ये सर्वाधिक सफल टीम फेरारी ही आहे. या टीमने २३५ रेस जिंकल्या असून मायकेल शुमाकर, वेलारी याच टीमचे आहेत. मेक्लारेजने १८२, विलियम्सने ११४, मर्सिडीजने ८९, रेड बुलने ५९ विजय आत्तापर्यंत मिळविले आहेत. १९९६ ते २००६ या काळात या रेसवर फेरारीचे वर्चस्व राहिले आहे. ३९ विविध देशातील चालक या रेसचा हिस्सा राहिले असून त्यात सर्वाधिक चालक ब्रिटनचे आहेत. ब्रिटनचे १६३, अमेरिकेचे १५८, इटलीचे ९९ चालक या रेसचा हिस्सा होते तर भारताचे नारायण कार्तिकेयन आणि करूण चांदोल या दोघांनी एफवन रेस मध्ये सहभाग घेतला आहे.

या रेसमध्ये सर्वाधिक विजय मायकेल शूमाकरच्या नावावर असून त्याने ९१ वेळा, लुईस हेमिल्तन याने ७४ वेळा तर सेबेस्टियन वेटलने ५२ वेळा विजय मिळविला आहे.

Leave a Comment