नवीन युगानुसार जपान मध्ये बदलणार खूप काही

yugjapan
प्रत्येक देश काही न काही परंपरा बाळगून असतो आणि त्या त्या देशाचे नागरिक या परंपरा अभिमानाने आयुष्यभर पाळतातही. काही परंपरा तेथील नागरिकांचे आयुष्य बदलवून टाकणारया असतात. उगवत्या सूर्याचा देश जपान या यादीतला महत्वाचा देश म्हणायला हवा. या देशात १ मे पासून रेवा या नव्या युगाची सुरवात होत आहे. जपानचा तख्तशिन राजा जेव्हा त्याच्या गादीवरून पायउतार होतो आणि त्याच्या जागी नवीन राजा येतो तेव्हा त्या युगाचा अंत झाला असे मानून नवे युग सुरु केले जाते. सध्याचे राजे अकीहोतो ३१ वर्षे राजपद भोगल्यावर आता राजगादीवरून पायउतार होत असून त्यांनी हा राजमुकुट म्हणजे क्रीसेनथेमम थ्रोन मुलगा क्राऊन प्रिन्स नारुहितोच्या मस्तकावर ठेवला जाणार असल्याची घोषणा केली आहे.

naruhito
प्रिन्स नारुहितो १ मे रोजी राजपदावर येतील आणि तेव्हापासून रेवा नावाचे नवे युग जपान मध्ये सुरु होईल. सध्या तेथे हयासी नावाचे युग सुरु आहे. नव्या युगाबरोबर तेथे अनेक बदल होतील. मुख्य म्हणजे तेथील कॅलेंडर बदलेल. या काळात जपान मध्ये उत्सवाचे वातावरण असेल. लोकांची कागदपत्रे बदलतील. म्हणजे जन्म दाखल्यावर तारखेबरोबर रेवा युग असे लिहिले जाईल. जपान मध्ये राजाच्या हाती खूप सत्ता नाही. इतकेच काय पण नवीन युग कोणते याचे नाव सरकारच ठरविते. राजा त्याला केवळ अनुमती देतो. हयासी याचा अर्थ होता शांती मिळविणे आणि रेवाचा अर्थ आहे आदेश आणि सदभाव.

japan
जपान मध्ये युगाला गेन्गो म्हटले जाते आणि याचबरोबर नवीन युगात नाणी, नोटा, वर्तमानपत्रे, कॅलेंडर यात जुन्या गेन्गो ऐवजी नव्या गेन्गोचा वापर केला जातो. जपानी रोजच्या जीवनात गेन्गोचा वापर करतात. डायरीत नवीन युगाचे नाव लिहिले जाते. ही परंपरा जुनी आहे पण ती चीनकडून जपानी लोकांनी घेतली आहे. चीनमध्ये मोठी त्सुनामी आली, खूप काही चांगले घडले तर नवीन युग सुरु झाले असे मानले जाते. जपान मध्ये पहिल्या युगाची म्हणजे मेजी युगाची सुरवात १८६६ पासून झाली आणि ते १९१२ मध्ये संपले. यावेळीही अनेक सुधारणा केल्या गेल्या. त्यावेळी राजाला अधिक ताकद आणि सत्ता देण्याचा निर्णय घेतला गेला होता मात्र कालांतराने तो मागे पडला आणि राजाची सत्ता तसेच ताकद कमी झाली.

Leave a Comment