टाटा जेएलआरची मेड इन इंडिया वेलर लाँच

velar
टाटांच्या जग्वार लँड रोव्हरची मेड इन इंडिया रेंज रोवर वेलर मंगळवारी भारतात सादर करण्यात आली. या गाडीची एक्स शोरूम किंमत ७२.४७ लाख रुपये आहे आणि तिचे बुकिंग सुरु झाले आहे. या गाडीची डीझेल आणि पेट्रोल अशी दोन्ही व्हेरीयंट सादर करण्यात आली असून विशेष म्हणजे या दोन्हीची किंमत एकच आहे. जेएलआर इंडियाचे अध्यक्ष रोहित सुरी यांनी ही माहिती दिली.

सुरी म्हणाले, आम्ही या गाडीची किंमत अतिशय स्पर्धात्मक ठेवली आहे. इतक्या किमतीत ग्राहकाला ब्रिटनच्या सर्वश्रेष्ठ डिझाईन, लग्झरी आणि टेक्नॉलॉजीचा फायदा मिळणार आहे. त्यातून ही गाडी आता भारतात बनली असल्याने ती ग्राहकाचे लक्ष अधिक वेधून घेईल अशी अपेक्षा आहे. तसेच यामुळे आमची स्थानिक उत्पादन आणि भारतीय बाजार यासाठी असलेली प्रतिबद्धता आम्ही सांभाळली आहे.

या कारची डिलिव्हरी मे महिन्यापासून दिली जाणार आहे. या एसयूव्हीला २.० ली. चे पेट्रोल आणि २.० ली.चे डीझेल इंजिन दिले गेले असून दोन्ही व्हेरीयंट मध्ये ८ स्पीड टोर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटीक गिअर बॉक्स दिला गेला आहे. वायफाय, प्रो सर्व्हीसेससह टच प्रो ड्यूओ इन्फोटेनमेंट सिस्टीम, फोर झोन क्लायमेट कंट्रोल, पॉवर्ड टेलगेट व पार्क असिस्ट फीचर्स आहेत. एलइडी हेडलाईट दिले गेले आहेत. वेलर पूर्वी जेएलआर च्या एक्सए, एक्सजे, एक्सएफ, एफपेस, डिस्कव्हरी स्पोर्ट्स, रेंज रोव्हर एव्होक या गाड्यांचे उत्पादन भारतात सुरु केले गेले आहे.

Leave a Comment