आपल्या युजर्ससाठी दरवेळेस व्हॉट्सअॅप वेगवेगळे फिचर्स घेऊन येत असते. आता आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप 5 नवीन फिचर्स घेऊन येणार असल्याची चर्चा असून Beta वर्जनमध्ये यातील काही फीचर्स आहेत. पण सर्व फीचर्स लवकरच iso आणि अॅड्रॉईड व्हर्जनला वापरता येणार आहेत.
आपल्या नवनवीन फीचर्समुळे व्हॉट्सअॅप कायमच लोकप्रिय आहे. आता त्यामध्ये अजून 5 नवे फीचर्स येणार आहेत. फॉरवर्ड मेसेज, फिंगरप्रिंट लॉक, डार्क मोड, रँकिंग कॉन्टॅक्ट, कॉन्झिकेटिव्ह व्हॉइस मेसेज अशी 5 फीचर्स सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहे. त्याबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
व्हॉट्सअॅप लवकरच आणणार हे पाच नवीन फीचर्स
‘फॉरवर्डिंग इन्फो’ आणि ‘Frequently Forwarded’ यांचा व्हॉटसअॅपच्या नव्या फीचरमध्ये समावेश करण्यात आला आहे. मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळे मिळणार आहे. कोणता मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला आहे हे पाहण्यासाठी तो आधी तुम्ही फॉरवर्ड केला पाहिजे. फॉरवर्ड केल्यानंतर जर तुम्ही मेसेज इन्फो चेक केला तर तर तुम्हाला मेसेज कितीवेळा फॉर्वर्ड केला आहे ते समजते. तुम्ही यामध्ये तुमचे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड घालता. आता व्हॉट्सअॅपनेच त्यासाठी फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस लॉकचा पर्याय दिला आहे. दोन्ही पर्याय वापरून तुम्ही व्हॉट्सअॅपचे चॅट लॉक किंवा अनलॉक करू शकता.
WaBetaInfo या ट्विटर अकाऊंटवरून ज्यांना व्हॉट्सअॅपवरील ब्राईटनेसमुळे त्रास होतो अशांसाठी डार्क मोडचा पर्याय उपलब्ध करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये चॅट विंडो पूर्ण काळ्या किंवा राखाडी रंगाची असेल. सध्या प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी याचा वापर केला जातो आहे. समजा व्हॉट्सअॅपवर तुम्हाला 3 ऑडिओ फाईल आल्या तर प्रत्येक फाईल प्ले करावी लागते. पण आता सगळ्या ऑडिओ फाईल ऑटोमॅटिकली प्ले करण्यासाठी Continous Voice Note Playback या फीचरवर काम सुरू आहे. ज्या व्यक्तींशी तुम्ही व्हॉट्सअॅपवर सर्वात जास्त बोलता त्यांचे नाव ऑटोमॅटिकली प्रथम येईल आणि त्याचा सिक्वेन्स लावला जाईल. सध्या व्हॉट्सअॅपकडून या फीचरवर काम चालू असल्याची माहिती मिळते आहे.