एवढ्या संपत्तीची मालकिन आहे उर्मिला मातोंडकर

urmila-matondkar
ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची खुप चर्चा होत आहे. काँग्रेसकडुन उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार आहे. नुकताच तिने आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञपत्रात तिने आपली संपत्ती कोटींच्या घरात असल्याची माहिती दिली आहे.

एकूण ४३ कोटी ९३ लाख ४६ हजार ४७४ रुपयांची उर्मिला मातोंडकरकडे जंगम मालमत्ता आहे. तर तिचा पती मीर यांच्याकडे ३२ लाख ३५ हजार ७५२ रुपयांची मालमत्ता आहे. त्याचबरोबर तिच्याकडे ६६ लाख ७४ हजार ५९१ रुपये किंमतीची मर्सिडीज E२२०D आणि ७ लाख २४ हजार ७९९ रुपये किंमतीची आय २० अक्टिव्ह मनगा ही गाडी आहे. तिची स्थावर मालमत्ता ७ कोटी ४८ लाख ३५ हजार ४६२ रुपये तर तिच्या पतीच्या नावे २२ लाख ५५ हजार रुपये एवढी आहे.

वांद्रे येथे २ तर अंधेरी येथे १ असे एकूण ३ निवासी घर उर्मिलाच्या मालकीची आहेत. तर अंधेरी लिंक रोड परिसरात २ कोटी १३ लाख किंमतीची व्यावसायिक जागा आहे. मात्र, व्यावसायिक असलेल्या उर्मिलाच्या पतीच्या मालकीचा मीरा भाईंदर परिसरात ३० लाख रुपये किंमतीचे एक घर आहे. वसई येथे उर्मिलाच्या मालकीची ४ एकर शेती जमीन असून त्याची मार्केटनुसार किंमत ५५ लाख रुपये एवढी आहे. अलेवाडी तालुक्यात ५ एकर शेतजमीन असून त्याची किंमत १ कोटी १३ लाख रुपये आहे.

Leave a Comment