आता अभिनय क्षेत्रातही हात आजमावणार राम गोपाल वर्मा

ram-gopal-verma
वेगवेगळ्या विषयाला हात घालून त्यावर चित्रपट बनविण्यात हातखंडा असलेल्या दिग्दर्शकांमध्ये राम गोपाल वर्मा हे नाव अग्रस्थानी आहे. राम गापोल वर्मा यांनी आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यात त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग देखील केले आहेत. पण आता राम गोपाल वर्मा यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचे नक्की केले आहे. राम गोपाल वर्मा हे आपल्या भेटीला कोब्रा या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून तुमच्या भेटीला येणार आहे.

हिंदी आणि तेलुगु भाषेत कोब्रा हा चित्रपट बनणार असून राम गोपाल वर्माने त्यांच्या ५७ व्या वाढदिवशी यातून अभिनयात पदार्पण करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी ही घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.


एका खतरनाक व्यक्तीचा कोब्रा हा चित्रपट बायोपिक असून त्याला कोब्रा नावाने ओळखले जायचे. रस्त्यावरचा गुंड ते नक्षलवादी झालेल्या कोब्रा नंतर पोलिसांचा हस्तक झाला आणि त्यानंतर त्याने आपले स्वतःची दहशत निर्माण केली होती. दाऊद आणि छोटा राजन प्रमाणेच त्याने गुन्हेगारी जगतात स्वतःच्या नावाची दहशत निर्माण केली होती. तो नेमका कुठे राहतो हे मरेपर्यंत कळू शकले नव्हते. नवकलाकार के जी कोब्राची भूमिका साकारणार आहे. यात राम गोपाल वर्मा इंटिलिजन्स ऑफिसरची व्यक्तीरेखा साकारणार आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी रामूच्या या नव्या इनिंगबद्दल कौतुक केले आहे. अभिनयातील पदार्पणाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Leave a Comment