आता गुगल पे वरही उपलब्ध IRCTC ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग

google-pay
बुकिंग आता गुगल पे वरही आयआरसीटीसी ऑनलाईन ट्रेन तिकीट उपलब्ध करून देण्यात आले असून अँड्रॉईड आणि iOS प्लॅटफॉर्मवरही हा सपोर्ट देण्यात आला आहे. युजर्सना या सर्व्हिसच्या माध्यमातून गुगल पे च्या सहाय्याने ट्रेनचे तिकीट बुक अथवा कॅन्सलही करता येईल.

याबाबत माहिती देताना गुगल पे चे प्रॉडक्ट मॅनेजमेन्ट डायरेक्टर अम्बरिश यांनी सांगितले की, गुगल पे वर यापूर्वी abhiBus, Goibibo, RedBus, Uber आणि Yatra समवेत कॅब आणि बस तिकीट बुकिंग विकल्पांसंदर्भात युजर्सचा खुप चांगला प्रतिसाद होता. आता गुगल पे वरही आयआरसीटीसी हे उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे ट्रेनचा प्रवास प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार आहे.

युजर्स गुगल पे वर सीट उपलब्ध आहेत की नाही, ट्रेनचा प्रवास यासमवेत २ स्टेशनमधील अंतर या सर्व गोष्टींची माहिती घेऊ शकतात. या फिचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला गुगल पे च्या Business सेक्शनमध्ये जावे लागेल. त्यानंतर ट्रेन्सचा विकल्प निवडा लागेल. तुम्हाला येथे Book train tickets चा विकल्प मिळणार आहे. तुम्हाला त्यानंतर कोणत्या स्टेशनपासून कुठल्या स्टेशनपर्यंत प्रवास करायचा आहे याची माहिती द्यावी लागेल. तुम्हाला माहितीनुसार ट्रेन लिस्ट मिळेल. प्रत्येक ट्रेनमध्ये सीटची उपलब्धता आणि प्रवास भाडे तुम्ही तपासून बघू शकता. त्यानंतर सिलेक्टवर टॅप करून Ok वर click करा. येथे तुम्हाला IRCTC वर लॉगईन करावे लागेल आणि पॅसेंजर डिटेल्स भरावे लागतील. त्यानंतर Continue वर क्लिक करा. बुकिंग कन्फर्मेशनची विचारणा आता तुम्हाला करण्यात येईल. तेव्हा Continue वर क्लिक करा.

त्यानंतर पेमेन्ट मोड सिलेक्ट करून Continue वर टॅप करा. आता तुम्हाला आपला UPI PIN एन्टर करावा लागेल. तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाईटवर रिडायरेक्ट करण्यात येईल. येथे तुम्हाला आयआरसीटीसी पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल. – त्यानंतर SUBMIT वर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचे तिकीट बुक होईल.

Leave a Comment