कंगना ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री

karan-johar
बॉलीवूड आणि तुम्हाला निर्माता दिग्दर्शक करण जोहर आणि बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगणा राणावतमधील वाद काही नवीन नाही. करणने कंगणाला ‘बॉलिवूडचा माफिया’ म्हणून हिणवल्यानंतर जाहीरपणे तिचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. करणच्या स्टारकिडला नवनव्या चित्रपटात प्राधान्य देण्याच्या वृत्तीमुळे त्याच्यावर टीका करण्याची एक संधीही कंगना सोडत नाही.

नेपोटीझमच्या मुद्द्यावरून कंगनाला काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अप्रत्यक्ष टोला लगावणाऱ्या करणने तिच्याविषयीचे मत आता बदलले आहे असेच काही चित्र दिसत आहे. कारण त्याने एका कार्यक्रमात कंगनासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कंगना ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री असल्याचे म्हणत त्याने चक्क कंगणाचे कौतुक केले आहे. एवढे दिवस कंगनावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या करणच्या स्वभावात अचानक झालेल्या बदलाने सिनेरसिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि कंगणा राणावतमध्ये 2017 साली घराणेशाही या मुद्द्यावरून झालेला वाद चांगलाच गाजला होता. घराणेशाहीच्या वादाला करणच्या ‘कॉफी विथ करण’ या रिअॅलिटी चॅट शोमध्ये सुरुवात झाल्यानंतर या दोघांनीही एकमेकांवर बरीच खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती. पण आता करणने एका कार्यक्रमात कंगनासोबत काम करायला काहीच हरकत नसल्याचे म्हणत वाद क्षमवण्यासाठी एक पाऊल मागे घेतले आहे.

Leave a Comment