‘डॉन 3’मध्ये झळकू शकतात दिपवीर

deepveer
गेल्या अनेक दिवसांपासून फराहन अख्तरचा ‘डॉन 3’ हा चित्रपट चर्चेत असून या हिट चित्रपटातून शाहरुख खानने माघार घेतल्यानंतर या चित्रपटासाठी निर्माते रणवीर सिंहच्या नावाचा विचार करत असून त्याचबरोबर रणवीर सोबतच दीपिका पादुकोणच्या नावाचा अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी विचार केला जात आहे.

यासंदर्भातील वृत्त डेक्कन क्रोनिकलने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी ‘डॉन 3’ साठी दीपिका पादुकोणला विचारले आहे. त्याचबरोबर या भूमिकेसाठी कॅटरिना कैफचे नावदेखील जोरदार चर्चेत आहे. ‘डॉन3’ साठी जर दीपिकाचे नाव फायनल करण्यात आले तर दीपिका आणि रणवीर ही जोडी लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतील. ही जोडी 2018 मध्ये आलेल्या संजय लीला भन्सालींच्या ‘पद्मावत’ या सुपरहिट चित्रपटात दिसली होती.

Leave a Comment