नरेंद्र मोदी यांचे जगनमोहन आणि केसीआर हे पाळीव कुत्रे – चंद्राबाबू नायडू

chandrababu-naidu
आंध्रप्रदेश – लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचलेला असतानाच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी प्रतिस्पर्ध्यावर टीका करताना खुप खालची पातळी गाठली आहे. चंद्राबाबु नायडू यांचे वायएसआरसीपीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे प्रतिस्पर्धी असून नरेंद्र मोदी यांचे ते दोघेही पाळीव कुत्रे असल्याचे चंद्राबाबू यांनी म्हटले आहे. मच्छलीपट्टणम भागातील राजकीय रॅलीला चंद्राबाबू संबोधित करत होते.

जगनमोहन रेड्डी व केसीआर यांच्यावर चंद्राबाबू नायडू यांनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, कुत्र्याचे बिस्कीट जगनमोहन रेड्डी खातात, हे लाजिरवाणे आहे. आपल्यामध्येही ते बिस्किट वितरित करत आहेत. जगनमोहन रेड्डी आणि केसीआर हे मोदींचे पाळीव कुत्रे आहेत.एका बिस्किटासाठी ते मोदींच्या पायाशीही जाणार आहेत. सावध रहा, ते बिस्किट जगन आपल्यामध्येही वितरित करणार असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.

वायएसआरसीपीच्या राजकीय प्रचाराला भाजप आणि टीआरएस हे पैसे पुरवित असल्याचा आरोप चंद्राबाबुंनी केला. पण कितीही पैसा खर्च केला तरी ते निवडणुकीत जिंकू शकणार नाहीत, असा त्यांनी दावा केला. पुढे ते म्हणाले की, मोदी आणि केसीआर यांनी १ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. केसीआर, तुम्ही तुमच्या राज्याचे पैसे आमच्याकडे का पाठविले? जरी तुम्ही १० हजार कोटी रुपये खर्च केले तरी तुम्हाला एक मतही मिळू शकणार नाही. आमचे लोक तुमच्यावर प्रचंड चिडलेले असल्याचे नायडू म्हणाले.

Leave a Comment