नुबिया अल्फा, मनगटावर बांधायचा स्मार्टफोन लाँच

nubia
चीनी टेक कंपनी नुबियाने मनगटावर बांधता येईल असा वेअरेबल स्मार्टफोन अल्फा या नावाने चीन मध्ये लाँच केला आहे. बार्सिलोना मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस २०१९ मध्ये हा फोन कंपनीने प्रथम सादर केला होता. दुमडून हातावर बांधता येणारा स्क्रीन हे या फोनचे खास वैशिष्ट आहे. चीन मध्ये एका खास इव्हेंट मध्ये हा फोन लाँच केला गेला.

या फोनच्या बेसिक मॉडेलची किंमत ३४९९ युआन म्हणजे ३६ हजार रुपये आहे. याच्याच १८ कॅरेट गोल्ड प्लेटेड एडिशनसाठी ग्राहकाला ४४९९ युआन म्हणजे ४६५०० रुपये मोजावे लागतील. याचे ब्लू टूथ ओन्ली व्हर्जन ही कंपनीने बनविले आहे मात्र ते अजून चीन मध्ये उपलब्ध केले गेलेले नाही. या फोनच्या इ सीम वाल्या ब्लॅक व्हेरीयंटची पहिली विक्री १० एप्रिल पासून होत आहे. या फोनला ४ इंची स्क्रीन दिला गेला असून १ जीबी रॅम व आठ जीबी स्टोरेज दिले गेले आहे. फोनची बॅटरी फक्त ५०० एमएचची आहे मात्र ती युजरला एक ते दोन दिवसाचा बॅक अप देईल असा कंपनीचा दावा आहे. ब्लू टूथ, वायफाय, ४ जी सपोर्ट सह येणारा हा इ सीम फोन टेक्स्ट मेसेज, कॉल, इंटरनेट ब्राउजिंग अशी अन्य फोन प्रमाणेच कामे करेल. फोटो साठी यात ५ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला असून त्यावर व्हिडीओ शूट करता येणार आहे.

या फोनमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकर सह एअर कंट्रोल फिचर दिले गेले असून त्यामुळे केवळ हँड जेस्चरने फोन मेन्यू स्क्रोल करता येणार आहे.

Leave a Comment