एकाच शाळेतील सात शिक्षिका प्रेग्नंट, आठ बाळे जन्माला येणार

pregnant
अमेरिकेत नुकतीच एका स्त्रीरोग आणि प्रसूती रुग्णालयातील ९ नर्स एकाचवेळी प्रेग्नंट असल्याची बातमी आली होती ती शिळी व्हायच्या आतच आता याच प्रकारची आणखी एक बातमी आली आहे. यावेळी एकाच शाळेतील १५ पैकी सात म्हणजे जवळ जवळ निम्म्या शिक्षिका प्रेग्नंट असून या सात माता आठ मुलांना जन्म देणार आहेत कारण त्यातील एकीला जुळे होणार आहे.

अमेरिकेच्या कॅन्सास मधील ओक स्ट्रीट प्राथमिक शाळेत ही घटना घडली असून बातमी देईपर्यंत त्यातील दोघींना मुली झाल्या असल्याची खबरही आली आहे. या सर्व शिक्षिका मार्च ते ऑक्टोबर या काळात बाळांना जन्म देणार आहेत. एकाचवेळी आलेल्या या बेबी बूम मुळे शिक्षिका, मुख्याध्यापिका यांना एकाचवेळी आश्चर्य, आनंद आणि नवल अश्या भावना अनुभवण्याची संधी मिळाली आहे. मुख्याध्यापिका एश्ले मिलर म्हणाल्या प्रथम तिघींनी मला त्या आई होणार असल्याची बातमी दिली तेव्हा मला विशेष वाटले नाही पण लवकरच चौथ्या शिक्षिकेने आणि त्यापाठोपाठ आणखी तिघींनी हीच बातमी दिल्यावर माझा विश्वास बसला नाही. माझी चेष्टा तर तुम्ही करत नाही ना असेही मी त्यांना विचारले. पण काही असले तरी हि आनंदाची बाब आहे. आता आम्हाला पँपर, हगीज सारख्या डायपर कंपन्याकडून स्पॉन्सरशिप मागता येईल अशी पुस्ती त्यांनी जोडली.

या सर्वाना आता प्रसूती रजा देणे भाग आहे त्यामुळे शाळेत नवीन शिक्षिका तात्पुरत्या बेसवर भरल्या गेल्या आहेत. या शाळेत नर्सरी वर्ग नाही मात्र आता एकाचवेळी अनेक छोटी बाळे जन्माला येत आहेत तेव्हा हे विद्यार्थी नर्सरी साठी आहेत तेव्हा त्याची परवानगी घ्यावी काय असा विचार करत आहोत असेही एशले यांनी हसत हसत सांगितले. या सर्व प्रेग्नंट शिक्षिकांच्या तारख्या मार्च ते ऑक्टोबर मध्ये आहेत.

विशेष म्हणजे नॉर्थ कॅरोलिना मध्येही अग्निशमन दलातील सात कर्मचारी एकाच सुमारास विवाहबद्ध झाले होते आणि त्याच्या बायकाही आता एकाचवेळी प्रेग्नंट असल्याची बातमी नुकतीच आली आहे. एकंदरीत अमेरिकेत बेबी बूमचा सिझन आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

Leave a Comment