तिकीट आरक्षणाच्या नियमात रेल्वेकडून बदल

indian-railway
आता काही दिवसांनी उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात होणार असल्यामुळे आपल्यापैकी कित्येकजणांनी गावी किंवा पर्यटनाला जाण्याचा बेत आखूनच ठेवल असेल यात काही शंका नाही. पण आज आम्ही तुम्हाला काही रेल्वेच्या आरक्षणाबाबत काही महत्वपुर्ण माहिती देणार आहोत. कारण रेल्वेने तिकिट आरक्षणात बदल केले आहेत. यावेळी रेल्वेने महिलांसाठी जास्त सीट्स ठेवल्या आहेत. तसेच खालच्या 4 सिट्स ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित असतील. या अगोदर त्यांची संख्या 3 होती.

महिलांसाठी मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये 6 स्लिपर बर्थ आरक्षित असतील. गरीब रथ एक्सप्रेससारख्या ट्रेन्समध्ये 3AC वर्गात 6 बर्थसीट आरक्षित असतील. राजधानी, दुरांतो आणि वातानुकूलित ट्रेन्समध्ये महिलांसाठी 6 बर्थचा कोटा वाढवला आहे. ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षावरील महिला, गरोदर महिला, एकटा प्रवास करणारी महिला यांना यांचा फायदा होईल.

सर्व ट्रेनमधील स्लीपर बर्थपैकी 6 खालच्या सीट्स आणि 3AC मधील खालच्या 3 सीट्स ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आरक्षित असतील. राजधानी आणि दुरांतोसारख्या ट्रेन्समध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 सीट्स आरक्षित असतील. याआधी या सीट्सची संख्या 3 होती.

Leave a Comment