मुंबई – भारतीय संघाची आयसीसीच्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी १५ एप्रिलला मुंबईत घोषणा करण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेचा थरार ३० मेपासून सुरू होणार आहे.
या तारखेला होणार विश्चचषक स्पर्धेसाठी खेळणाऱ्या भारतीय संघाची घोषणा
कोणत्या क्रिकेटपटूंना जाहीर होणाऱ्या विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळणार याबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेट निवड समितीचे प्रमुख एम. एस. के प्रसाद यांनी यापूर्वी २ एप्रिलला २० एप्रिलपूर्वी विश्वचषकासाठीचा भारतीय संघ घोषित करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती.
३० मे राजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना तर १४ जुलैला क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावार अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. अनेक क्रिकेट पंडितांनी आतापर्यंत भारत आणि यजमान संघ इंग्लंडला विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे.