देशाच्या कल्याणासाठी तुम्ही खुशाल निर्णय घ्या, पण हुकूमशाही नका आणू : उदयनराजे

udyanraje-bhosale
मुंबई – याआधीच अनेक कलाकारांनी आणि साहित्यिकारांनी देशात हुकूमशाही सुरू असल्याचे म्हटले आहे. केवळ दोनच लोक देश चालवत असल्याचे आरोपही आतापर्यंत अनेकांनी केले आहे. आता देशात हूकुमशाही असल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी देखील म्हटले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपला देश मोदी सरकारने विकल्याची घणाघाती टीका उदयनराजे यांनी केली.

तुम्ही देशाच्या कल्याणासाठी खुशाल निर्णय घ्या. पण हुकूमशाही आणू नका. एक माणूस एका संध्याकाळी टीव्हीवर येतो आणि नोटबंदी जाहीर करतो. त्या माणसाने नोटबंदी आणि इतर निर्णय घेताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते. पण मोदींनी तस न करता देशावर अचानक नोटबंदी लादल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. उपासमारीची वेळ अनेकांवर आल्याचे उदयनराजे यांनी म्हटले.

नॅचरल गॅसचे, नॅचरल ऑईलचे देशात साठे आहे. पण हे साठे जवळच्या मित्रांना सरकारने दिल्याची टीका उदयनराजे यांनी मोदींचे नाव न घेता केली. मोदींच्या मित्रांची आज घडीला संपत्ती देशाच्या बजेटपेक्षा अधिक झाली आहे. देशातील युवकांना या संपत्तीचा उपयोग करून मोफत शिक्षण, मोफत वैद्यकीय सुविधा, मोफत निवारा देता आला असता. पण जवळच्या मित्रांनाच हे सगळे दिल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. तसेच रशियाप्रमाणे देशाचे तुकडे होऊन नये, अशी आशा उदयनराजे यांनी व्यक्त केली.

Leave a Comment