जाणून घ्या पीएफ आणि पीपीएफ मधील मोठा फरक

PF
मुंबई : नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खूप महत्त्वाचा असून ती निवृत्तीनंतरची एक पुंजी असते. पण याबद्दल अनेकांना कमी माहिती असते. पीएफ आणि पीपीएफ यामधील फरक अनेकांना माहीत नसतो. आज आम्ही तुम्हाला यातील फरका बद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात यातील फरक…

नोकरदारांच्या पगारातील काही ठराविक रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. तुमच्या पीएफमध्ये कापलेला हिस्सा जमा होतो. ही एकप्रकारे गुंतवणूकच असते नोकरदारांना निवृत्तीनंतर आर्थिक फायदा व्हावा म्हणून ही योजना आहे. यांचे व्याज दर सरकार ठरवते. पीएफचा सध्याचा व्याज दर 8.65 टक्के आहे.

केंद्र सरकार चालवत असलेली पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही योजना आहे. त्यात तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे पैसे गुंतवू शकता. ते काही अनिवार्य नाही. ते ऐच्छिक आहे. कुठल्याही राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्टात तुम्ही पीपीएफ अकाऊंट उघडू शकता. तुम्हाला यासाठी कुठल्या कंपनीचे कर्मचारी असणे गरजेचे नाही. प्रत्येक तीन महिन्यांनी पीपीएफचा व्याज दर नक्की होतो. 1 एप्रिल 2019 ते 30 जून 2019पर्यंत पीपीएफ खात्यात 8 टक्के व्याज मिळेल.

कुठल्याही कंपनीतील कर्मचाऱ्यांचा पगार अनेक भागात असतो. बेसिक सॅलरी, ट्रॅव्हल अलाऊन्सेस, स्पेशल अलाऊन्सेस हेही असतात. प्रत्येक महिन्याला कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12 टक्के कापून पीएफ खात्यात टाकते. त्याबरोबर कंपनी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कडून 12 टक्के पैसे पीएफ खात्यात टाकते.

पीएफ खातेधारकांना पीएफ खाते उघडताच तुम्हाला आपोआप विमा सुरू होतो. तुम्हाला 6 लाखापर्यंत इंशुरन्स मिळतो. पीएफधारकांचे खाते निष्क्रिय असले तरी 3 वर्ष त्यात व्याज पडत राहते. पण 3 वर्षापेक्षा जास्त काळ निष्क्रिय राहिले तर मात्र व्याज मिळत नाही. आर्थिक तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की भले निष्क्रिय खात्यावर व्याज मिळत असले तरी तुम्ही ते ताबडतोब सक्रिय खात्यात ट्रान्सफर करा.नव्या नियमांनुसार पाच वर्षाहून अधिक काळ खाते निष्क्रिय राहिले तर त्यातील पैसे काढायला कर लागतो. तुम्ही कधीही पीएफमधून पैसे काढू शकता. ते अगदी सोपे आहे. तुम्ही पीएफ मधले 90 टक्के पैसे काढू शकता. जुन्या नोकरीतला पीएफ नव्या नोकरीत ट्रान्सफर होऊ शकतो. पीएफमधून पेंशनचा फायदाही मिळतो.

पीपीएफ म्हणजे हल्लीच्या काळात सुरक्षित आणि टॅक्सही वाचेल अशी गुंतवणूक असून तुम्ही यात वर्षाला कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता. पीपीएफची खासीयत अशी की तुम्हाला दर महिन्याला तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळू शकते. अर्थात, हे सर्व क्रेडिट मॅच्युरिटीनंतरच होते. दर महिन्याचे व्याज पूर्ण मिळावे यासाठी तुम्ही जर दर महिन्याला पैसे भरत असाल तर ते 5 तारखेच्या आत भरावे. पीपीएफमध्ये 5 तारखेच्या आत पैसे भरले तर आधीची रक्कम आणि नंतर टाकलेली रक्कम या दोन्हीवर व्याज मिळते. तुम्हाला त्याचा फायदा होतो.

Leave a Comment