‘नमो टीव्ही’नंतर या मालिकेतून होत आहे भाजपचा प्रचार ?

Bjp
मुंबई – देशात होणाऱ्या 17व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आचार संहिता लागू आहे. पण निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येत आहे. या तक्रारीत विशेष करुन सत्ताधारी भाजपचा सर्वाधिक समावेश आहे. भाजपचा ‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिक, ट्रेनमधील चहाच्या कपांवर लिहिलेले ‘मैं भी चौकीदार’ हे वाक्य, ‘नमो टीव्ही’ यानंतर आता आणखी एका मालिकेने प्रचार केल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


अँड टिव्हीवरील लोकप्रिय असलेल्या ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतून भाजपच्या सरकारी योजनांचा प्रचार करण्यात आला आहे. मालिकेचे मुख्य पात्र मनमोहन तिवारी हे एका भागात स्वच्छ भारत मोहिमेबद्दलची आणि मोदींनी ९ कोटी शौचालय बांधल्याची माहिती देत मोदींचे गुणगान गाताना दिसत आहेत.

याशिवाय उज्वला योजनेची माहिती अंगुरी भाभी म्हणजे शुभांगी अत्रे देताना दिसत आहे. शिवाय तुझसे हैं राबता या मालिकेतूनही भाजपच्या योजनांची माहिती देत नामुमकिन है अब मुमकिन असे वाक्य शेवटी मालिकेतील एका पात्राच्या तोंडी आहे. या सर्वामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment