दीपिकाचा ‘छपाक’मधील आणखी एक लूक व्हायरल

chapak
अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिकच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून ‘छपाक’मध्ये लक्ष्मीची भूमिका अभिनेत्री दीपिका पादुकोण साकारत आहे. तिने यासाठी बरीच तयारी केली आहे. दरम्यान दीपिकाचा या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाचा लक्ष्मीच्या भूमिकेतील हा लूक थक्क करणारा आहे.

लक्ष्मीनेही दीपिकाच्या या लूकची प्रशंसा केली. दीपिकाचा चित्रपटातील लूक पाहून मी फार खूश झाले. अशा लूकमध्ये सेलिब्रिटी समोर येताना पाहून चांगले वाटले, असे ती म्हणाली.


अभिनेता विक्रांत मेस्सीला मेघना गुलजार यांच्या या चित्रपटात दीपिकासोबत काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. अनेक चित्रपटात आतापर्यंत सहकलाकाराची भूमिका साकारणारा विक्रांत ‘छपाक’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीचा जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. तसेच अॅसिड हल्यानंतर मालती उर्फ दीपिकाला करावा लागणारा संघर्ष आणि तिच्यावर ओढावणाऱ्या संकटांवर मात करुन ती अखेर सुखी आयुष्य जगते हे दाखवण्यात आले आहे. 10 जानेवारी 2020 रोजी छपाक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment