2 इंजिनिअर तरुणांनी अॅपलला लावला तब्बल 62 कोटींची चुना!

apple
जगातील सर्वात प्रसिद्ध मोबाइल कंपनी अॅपलला 8,95,800 डॉलरचा म्हणजेच जवळपास 62 कोटी रूपयांचा चूना चीनच्या 2 इंजिनिअर्सनी लावला आहे. फसवणुकीचा हा कारभार अमेरिकेतच शिक्षण घेणाऱ्या या दोन तरूणांनी 2017 मध्ये सुरू केला होता. डुप्लिकेट आयफोनला खऱ्या आयफोनसोबत बदलण्याचे काम हे दोघेही करत होते. नंतर ओरिजिनल मोबाइल विकून पैसे कमावत होते. यांग्याग जोहू आणि क्वान जियांग असे अॅपलला चुना लावणाऱ्या या तरुणांचे नाव आहे. ऑरेगन यूनिव्हर्सिटीमधून जोहूने शिक्षण पूर्ण केले. तर बेंटन कॉलेजमध्ये शेवटच्या सेमिस्टरला क्वान आहे.

चीनहून डुप्लिकेट आयफोन दोन्ही तरूण मागवत होते आणि अ‍ॅपलच्या सर्व्हिस सेंटरला जाऊन सांगत होते की, हा आयफोन स्विच ऑन होत नाही. त्यावेळी त्यांना सर्व्हिस सेंटरचे लोक नवीन फोन देत होते. ग्राहकाच्या फोनमध्ये बिघाड झाल्यास अ‍ॅपल तो फोन रिपेअर करण्याऐवजी नवा फोन देतात. यासाठी पुरावा म्हणून बिलाचीही गरज नसते.

चीनमध्ये निर्मीत केल्या जाणाऱ्या डुप्लिकेट आयफोनची ओळख पटवणे कठीण आहे. कारण या फोनसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी या खऱ्या आयफोनसारख्याच असतात. हे फोन अशावेळी सेंटिग्स आणि सिरिअल नंबरने ओळखले जाऊ शकतात. मोबाइल ज्यासाठी ऑन असणे गरजेचे आहे. पण स्टोरमध्ये हेच दोघेही सांगत होते की, आयफोन सुरु होत नाही आणि कंपनी त्यांना नवीन फोन देत होती.

अ‍ॅपलच्या वेगवेगळ्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन दोन्ही तरूणांनी 3069 आयफोन रिप्लेस करण्यासाठी दिले, ज्यातील 1493 फोन अ‍ॅपलने बदलून दिले. हे नवीन फोन मिळाल्यावर ते फोन चीनला पाठवून देत होते. जे विकून त्यातून मिळणारे पैसे त्यांच्या अमेरिकन बॅंक अकाऊंटमध्ये टाकले जात होते.

अमेरिकन कस्टम एजन्सीने 2017 मध्ये हाँगकाँगहून आलेले 5 पार्सल पकडले. अ‍ॅपलची ज्यावर ब्रॅंडिंग होती. पण आत डुप्लिकेट आयफोन होते. एजन्सीने या प्रकरणाची चौकशी करताना क्वान जियांगला या पार्सलबाबत विचारपूस केली. तेव्हा समोर आले की, चीनहून त्याच्याकडे दर महिन्याला 20 ते 30 असेच आयफोन येतात. तो स्टोरमध्ये हे रिप्लेस करून परत पाठवतो.

अ‍ॅपलने क्वानला जून 2017मध्ये डुप्लिकेट आयफोन रिप्लेसमेंट प्रकरणी नोटीस पाठवली होती. त्याने या नोटीसला काहीच उत्तर दिले नाही. खरतर कधी कधीच तो स्टोरमध्ये फोन रिप्लेस करायला जात होता. कारण अ‍ॅपलच्या ऑनलाइन सर्व्हिसमधून तो एका एजंटला घरी बोलवून फोन रिप्लेसमेंटचे काम सहजपणे करत होता.

अ‍ॅपलने आता दोघांविरोधातही केस केली आहे. दोन्ही तरूणांनी त्यांच्या बचावासाठी सांगितले की, चीनहून येणारे आयफोन डुप्लिकेट होते हे त्यांना माहीत नव्हते. हे सांगून त्यांना फोन पाठवले जात होते की, हे फोन ओरिजिनल आहेत आणि ऑन होत नाहीत. मग ते फोन अमेरिकेतून बदलून घ्यायचे.

Leave a Comment