या देवी मंदिरात एकमेकांवर जळत्या मशाली फेकण्याची परंपरा

kateel
आता देशभरात चैत्री नवरात्र उत्सव सुरु झाला असून गावागावातील देवी मंदिरात देवी दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत. तसेच घराघरात नवरात्राची उपासना उपवास केले जात आहेत. मंगलोर येथील कथिला परमेश्वरी मंदिरात या दिवसात एका वेगळ्याच प्रथेची पालन करण्याची परंपरा असून ही परंपरा शेकडो वर्षे पाळली जात असल्याचे स्थानिक सांगतात.

shobha
या मंदिरात अग्नी केली नावाची ही परंपरा नवरात्रात पाळली जाते. हा उत्सव आठ दिवस चालतो. अतुर आणि कलात्तुर या दोन गावांचा या परंपरेत प्रमुख्याने सहभाग असतो. यानुसार येथे एकमेकांच्या अंगावर जळत्या मशाली फेकल्या जातात. यात सहभागी होणारे जीवाची पर्वा न करता सहभागी होतात. हा सोहळा १५ मिनिटे चालतो.

agni
या देवीला परमेश्वरी असे नाव असून ती दुर्गेचे रूप आहे. मंदिरात नवरात्राची सुरवात झाल्यावर आसपासच्या भागातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. अग्नी केली उत्सवापूर्वी पूजा अर्चा झाल्यावर देवीची भव्य शोभायात्रा काढली जाते. त्यानंतर भाविक तलावात स्नान करतात आणि हातात नारळाच्या शेंडीपासून बनविलेल्या मशाली घेतात. एकमेकांच्या समोर उभे राहून या पेटत्या मशाली एकमेकांच्या अंगावर फेकल्या जातात. एक व्यक्ती ५ वेळाच अशी मशाल फेकू शकते. मग तिने बाजूला होऊन मशाल विझवायची असते.

yakshgan
तलावात स्नान केल्यावर वेगवेगळे गट केले जातात आणि भाविक ही परंपरा पाळतात. देवी प्रसन्न व्हावी अशी त्यामागे भावना असते. ज्या व्यक्तींना शारीरिक पिडा किंवा आर्थिक त्रास असेल त्या व्यक्ती यात सहभागी होतात. या खेळात सामील झाल्याने सर्व अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे. येथे अद्भुत रंगमंच असून तेथे यक्षगान आयोजित केले जाते. दुर्गा परमेश्वरीची विविध रूपे नाटकातून आणि कथेतून सादर केली जातात. रंगमंचावर यक्षगान सादर केले जात असताना पाहणे हा फार अद्भुत अनुभव असून नोव्हेंबर ते मे या काळात यक्षगान सादर केले जाते. केवळ भारतातच नाही तर विदेशात सुद्धा यक्षगान कार्यक्रम केले जातात.

Leave a Comment