बिग बी ची नवी मर्सिडीज व्ही क्लास कार

vclass
बॉलीवूड मधील दिग्गज कलाकार आणि बिग बी नावाने मशहूर असलेले अमिताभ बच्चन यांना महागड्या कार्सचा प्रचंड शौक असून त्यांच्या गॅरेज मध्ये भारतातील सर्वात महागडी मर्सिडीज व्ही क्लास एमपीव्ही दाखल झाली आहे. लग्झुरीयस इन्टेरिअर व शानदार फीचर्स असलेल्या या कारची किंमत आहे ६८.४० लाख ते ८१.९० लाख. यात सहा सीटर आणि ७ सीटर अशी दोन व्हेरीयंट आहेत. पैकी बिग बीने कोणते व्हेरीयंट खरेदी केले त्याची माहिती दिलेली नाही. असेही समजते कि बिग बी ने त्याला विधू विनोद चोप्राने एकलव्य चित्रपटात उत्तम भूमिका केल्याबद्दल रोल्स रोईस फँटम भेट दिली होती ती बिग बीने विकली आहे आणि तिच्या जागी या एमपीव्ही ची वर्णी लावली आहे.

ही कार भारतात २४ जानेवारीला लाँच झाली होती. त्यात ६ सीटर व्ही क्लास एक्स्क्लुझिव्ह नावाने तर ७ सीटर एक्स्प्रेशन या नावाने आल्या आहेत. ६ सीटरची किंमत ८१.९० लाख तर ७ सीटरची किंमत ६८.४० लाख रुपये आहे. या एमपीव्ही ला २.१ लिटरचे डीझेल बी सिक्स इमिशन नॉर्मचे इंजिन दिले गेले असून ७ जी ट्रॉनिक ऑटो गिअरबॉक्स आहे. १०.९ सेकंदात ही कार ० ते १०० किमीचा वेग घेते आणि तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी १९५ किमी.

या कारच्या ६ सीटर मध्ये टेबल पॅकेज ऑप्शनमध्ये लिमोसिनप्रमाणे मागे ४ प्रवासी एकमेकासमोर बसू शकतात. प्रीमियम केबिन, कमांड इन्फोटेनमेंट सिस्टीम, मल्टीफंक्शनल स्टिअरिंग व्हील, लेदर अपहोलेस्ट्रीबरोबर सुरक्षेसाठी एअरबॅग्स, अटेन्शन असिस्टंट, ब्लाईंड स्पॉट डिटेक्शन, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ३६० डिग्री कॅमेरा, अॅक्टीव्ह पार्किंग असिस्टंट अशी फीचर्स आहेत.

Leave a Comment