खजुराहो मध्ये होणार हिरे संग्रहालय

diamonds
मध्यप्रदेशातील मंदिरांसाठी त्यातही इरोटिक मूर्ती मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या खजुराहो मध्ये आता आणखी एका आकर्षणाची भर पडणार आहे. मध्ये प्रदेश सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे आणि हिरे खरेदीसाठी परदेशी पर्यटकांनी गर्दी करावी यासाठी येथे हिरे संग्रहालय आणि विक्री केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव सादर झाला असून लोकसभा निवडणुका नंतर हे काम सुरु होत असल्याचे सांगितले जात आहे.

या हिरे संग्रहालयात पन्ना खाणीतून मिळालेले ३२३ कॅरेटचे हिरे मांडले जातील. हे हिरे टेस्टिंगच्या काळात हिरा कंपनी रियो टींटोला पन्ना खाणीतून मिळाले होते. या कंपनीने टेस्टिंगचे काम संपविल्यावर ३२३ कॅरेटचे हिरे मध्यप्रदेश सरकारला दिले होते. पन्ना खाण बंद झाल्यावर या कंपनीने २००७ ते २०१५ या काळात येथे टेस्टिंगचे काम केले होते. हेच हिरे संग्रहालयात मांडले जाणार असून त्याची विक्रीही केली जाणार आहे.

खजुराहो येथे चंदेल कालीन मंदिरे असून ती पाहण्यासाठी देशविदेशातून अनेक पर्यटक दरवर्षी येतात. हिरा संग्रहालायामुळे पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण निर्माण होईल असे मध्य प्रदेश पर्यटन महामंडळचे अधिकारी सांगतात. यामुळे या संग्रहालय उभारणीत हे महामंडळ मदत करणार आहे.

Leave a Comment