विश्वचषकासाठी न्युझिलंड संघाची घोषणा, टॉम बलंडेल या नवख्या खेळाडूला संधी

newzeland
३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या २०१९ च्या विश्वचषकासाठी संघाची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यात पहिला क्रमांक लावला तो २०१५ विश्वचषकाचा उपविजेता न्युझिलंडच्या संघाने.  केन विल्यम्सनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्युझिलंड संघाने ५ फलंदाज,  २ अष्टपैलू, ४ जलदगती गोलंदाज, २ फिरकी गोलंदाज व २ यष्टीरक्षकांना संधी दिली आहे. १५ जणांच्या संघात टॉम बलंडेल या नवख्या यष्टीरक्षकाला दुखापतग्रस्थ सेईफर्टच्या जागी संधी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे टॉम बलंडेलने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही पण त्याने कसोटी व टी-२० संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. टॉम लॅथम फलंदाजीसोबत यष्टीरक्षणात महत्वाची भूमिका बजावत असल्याने बलंडेलला अंतिम ११ मध्ये संधी मिळणे अवघडच आहे.

१९७५ सालच्या पहिल्या विश्वचषकापासुन न्युझिलंडचा संघ प्रत्येक विश्वचषकात खेळला आहे पण आतापर्यंत न्युझिलंडला विश्वचषक जिंकता आलेला नाही. रिटर्ड हॅडली, जॉन राईट, मार्टिन क्रो, जेफ क्रो, स्टिफन फ्लेमिंग, ख्रिस हॅरीस, ख्रिस केर्न्स, नॅथन अॅस्टल,ब्रेंडन मॅक्लम, रॉस टेलर आणि सध्या संघाचे नेतृत्व करणारा केन विल्यम्सन यांसारख्या खेळाडुंनी संघाने प्रतिनिधित्व केले असले तरी संघाला मागील ११ विश्वचषक स्पर्धांत एकदाही विश्वचषकावर आपले नाव कोरता आले नाही. २०१५ च्या विश्वचषकात न्युझिलंडने पहिल्यांदा अंतिम सामन्यांत धडक मारली होती पण त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. १९७५ ते २०१५ पर्यंत न्युझिलंडने ४ वेळेस उपांत्य सामन्यांत (१९७५, १९७९, १९९२ व १९९९) तर २०१५ मध्ये उपविजेतेपद पटकावले आहे.

संघ- केन विल्यम्सन(कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंड बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, मॅट हेनरी, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, जिम्मी नीशम, हेनरी निकोलस, मिशेल सेंटनर, इश सोधी, टीम साउदी, रॉस टेलर

न्युझिलंडच्या खेळाडुंची विश्वचषकातील कामगिरी
सर्वाधिक धावा – स्टिफन फ्लेमिंग (१०७५)
सर्वोच्च धावा – मार्टिन गुप्टील (२३७*)
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा – मार्टिन गुप्टील (५४७)
सर्वाधिक शतके – ग्लेन टर्नर, मार्टिन गुप्टील, स्कॉट स्टायरिस, स्टिफन फ्लेमिंग, नॅथन अॅस्टल प्रत्येकी (२)
सर्वाधिक अर्धशतके – मार्टिन क्रो (८)
सर्वाधिक बळी – जेकब ओरम (३६ बळी)
सर्वोच्च गोलंदाजी पृथ्थकरण – टीम साउदी (९-०-३३-७)
एका विश्वचषकात सर्वाधिक बळी – ट्रेंट बोल्ट (२२ बळी)
सर्वोच्च धावसंख्या – ३९३/६ वि. वेस्ट इंडिज

न्युझिलंडचे सामने
१ जुन २०१९ वि. श्रीलंका, कार्डीफ
५ जुन २०१९ वि. बांग्लादेश, लंडन
८ जुन २०१९ वि. अफगाणिस्तान, ब्रिस्टॉल
१३ जुन २०१९ वि. भारत, नॉटिंगहॅम
१९ जुन २०१९ वि. दक्षिण आफ्रिका, बर्निंगहॅंम
२२ जुन २०१९ वि. वेस्ट इंडिज, मॅंचेस्टर
२६ जुन २०१९ वि. पाकिस्तान, बर्निंगहॅंम
२९ जुन २०१९ वि. ऑस्ट्रेलिया, लंडन
३ जुलै २०१९ वि. इंग्लंड, चेस्ट-ले-स्टिट

Leave a Comment