पाडव्याच्या दिवशी मुंबई इंडियन्सने दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

combo1
आयपीएल सुरु असताना त्या दरम्यान येणाऱ्या सणाच्या मराठी चाहत्यांना शुभेच्छा देण्यात मुंबई इंडियन्स सर्वात आघाडीवर असते. पण एखाद्या सणाची संपूर्ण माहिती नसेल तर कशी फजिती होते याचा प्रत्यय या गुढीपाडव्या दरम्यान आला आहे.मराठमोळ्या वातावरणात वाढलेल्या व मराठी म्हणता येतील अशा सिद्धेश लाड आणि सूर्यकुमार यादव या मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंनी गुढी पाडवा साजरा करताना आपण तिळगुळ कसे वाटायचो हे सांगितले आणि स्वत:ची तसेच संघाची फजिती करून घेतली आहे.

आज सकाळी गुढी पाडव्याच्या सकाळी मुंबई इंडियन्सने ट्विट करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. पण शुभेच्छा देताना खेळाडूंकडून चूक झाली. गुढी पाडव्याच्या सर्व चाहत्यांना रोहित शर्माने शुभेच्छा दिल्या. गुढी पाडवा कसा साजरा करत होतो, हे सांगताना सिद्देश लाड आणि सुर्यकुमार यादव यांनी मकरसंक्रातीच्या तिळगुळाचा किस्सा सांगितला. मुंबई इंडियन्सची सोशल मीडियावर सुर्यकुमार यादव आणि सिद्देश लाड यांच्यामुळे चांगलीच फजिती झाली आहे.

मुंबई इंडियन्सची सोशल मीडियावर चाहत्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. गुढी पाडवा आणि मकर संक्रात या दोन सणांमधील फरक माहिती घेऊन व्हिडीओ तयार करायचा? गुढी पाडवा आणि संक्रातीमधील फरक मराठी असून माहित नाही का? असे प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले. मुंबई इंडियन्सने चाहत्यांच्या नाराजीनंतर अधिकृत ट्विट डिलीट केले आहे. मात्र, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Comment