नेपोलिअनच्या प्रेमपत्राना लिलावात ५ लाख युरोची किंमत

josefine
फ्रान्सचा चिमणा शिलेदार जगज्जेता नेपोलीयन याने त्याची पत्नी जेसोफेन हिला १७९६ ते १८०४ या काळात लिहिलेल्या तीन प्रेमपत्रांचा लिलाव गुरुवारी पॅरीस मध्ये करण्यात आले तेव्हा त्यांना ५,१३००० युरो म्हणजे ३ कोटी ९८ लाख अशी विक्रमी किंमत मिळाली. १७९६ साली नेपोलिअन इटलीच्या मोहिमेवर होता तेव्हा त्याने हि पत्रे पत्नीला लिहिली होती.

यातील एका पत्रात नेपोलिअन लिहितो, माझ्या प्रिय सखी, तुझ्याकडून मला कोणतेही पत्र आले नाही. तू नक्कीच काहीतरी खास कामात गुंतलेली असणार कारण त्यामुळे तुला नवऱ्याचा विसर पडलेला दिसतो. प्रचंड काम आणि प्रचंड थकवा अश्या वेळी मला फक्त तुझीच आठवण येते. नेपोलियन आणि जेसोफेन यांची प्रेमकहाणी फ्रांसच्या इतिहासात खूपच प्रसिद्ध आहे. तसेच नेपोलिअनला जगातील सर्वात महान सेनापती मानले जाते.

नेपोलियन आणि जेसोफेन यांचा विवाह मार्च १७९६ साली झाला होता. त्यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट काही वर्षापूर्वी लिलाव करण्यात आले होते. त्यावर ८ मार्च १७९६ अशी तारीख असली तरी प्रत्यक्षात त्यांचे लग्न दुसरे दिवशी झाले होते असे सांगतात. या लग्नाची नोंदणी पॅरीस येथे झाली होती. नेपोलिअन आणि जेसोफेन कितीही प्रेमात बुडाले असले तरी ते दोघे पक्के व्यवहारी होते हे लग्नाच्या करारावरून दिसून येते. यात एकमेकांचे कर्ज अथवा गहाणवट यासाठी दुसरा जबाबदार राहणार नाही तसेच दोघांची कॉमन मालमत्ता नसेल असा स्पष्ट उल्लेख आहे. हे लग्न त्यांना मुल न झाल्याने १८१० ला संपुष्टात आले होते. या लग्न सर्टिफिकेट ला लिलावात १ लाख ३५ हजार डॉलर्सची किंमत मिळाली होती.

Leave a Comment