बेजोस मेकेन्झी घटस्फोट, मेकेंझीला मिळणार २४३० अब्ज रुपये

mekenzi
अमेझोनचे जेफ बेजोस आणि त्याची पत्नी मेकेन्झी याच्या घटस्फोटाला गुरुवारी अंतिम स्वरूप देण्यात आले असून न्यानुसार मेकेन्झीला ३५ अब्ज डॉलर्स म्हणजे २४३० अब्ज रुपये मिळणार आहे. यामुळे हा जगातील महागडा घटस्फोट ठरला आहे. घटस्फोटामुळे मिळत असलेल्या रकमेमुळे मेकेंझी जगातील सर्वत श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर आली आहे तर इतकी प्रचंड रक्कम देऊनही जेफ बेजोस चे जगातील सर्वाधिक श्रीमंत हे स्थान कायम राहिले आहे.

जेफ आणि मेकेन्झी यांचा विवाह १९९३ साली झाला आणि त्यांना चार मुले आहेत.१९९४ साली जेफने घराच्या गराजमध्ये अमेझोनची सुरवात केली तेव्हा त्याची पहिली कर्मचारी मेकेन्झी होती. जेफ ५५ वर्षाचा असून मेकेन्झी ४८ वर्षाची आहे. जेफ बेजोसचे अफेअर असल्याचे उघडकीस आल्यानंतर जानेवारीत या दोघांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा ट्विटर वरून केली होती. घटस्फोटानंतर मेकेन्झीची अमेझोन मध्ये ४ टक्के भागीदारी राहिली असून पूर्वी ती १६.३ टक्के होती. फोर्ब्सच्या माहितीनुसार मेकेन्झीला मिळालेल्या रकमेमुळे ती श्रीमंत महिला यादीत तीन नंबरवर आली आहे. मेकेन्झीने द वॉशिंग्टन पोस्ट आणि स्पेस एक्स्प्लोरेशन फार्म ब्ल्यू ओरिजिन मधील सर्व भागीदारी पती बेजोसला दिली असल्याचे जाहीर केले आहे.

जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत लोरीयालची वारस फ्रेकोड्स बेहेनकोर्ट मेयर्स पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर वॉलमार्टची इलिन वॉल्टन आहे.

Leave a Comment